Kajol and Twinkle Khanna have common Ex Boyfriend : अभिनेत्री काजोल व ट्विंकल खन्ना या दोघीही सध्या त्यांच्या ‘टू मच विथ ट्विंकल अँड काजोल’ या शोमुळे चर्चेत आहेत. प्राइम व्हिडीओवरील या शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांशी त्या करिअर तसेच वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विविध विषयांवर गप्पा मारतात. शोच्या ताज्या एपिसोडमध्ये काजोल व ट्विंकल दोघींनी एकाच व्यक्तीला डेट केल्याचा खुलासा केला आहे.
ट्विंकल खन्ना व काजोल यांचा एक्स बॉयफ्रेंड कॉमन आहे. ट्विंकलने स्वतः हा खुलासा केला. त्यानंतर काजोल लाजली आणि नाव घेऊ नकोस असं सांगितलं. ‘धिस ऑर दॅट’ सेशनमध्ये दोघींनी वैयक्तिक आयुष्याबद्दल ही माहिती उघड केल्याने पाहुणी म्हणून आलेल्या क्रिती सेनॉनला धक्का बसला.
ट्विंकल खन्नाने काय म्हटलं?
‘चांगल्या मैत्रिणींनी एकमेकांच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करू नये,’ असं विचारल्यावर ट्विंकल खन्ना म्हणाली, “माझ्यासाठी माझी मैत्रीण कोणत्याही पुरुषापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. कारण बॉयफ्रेंड तर कुठेही मिळेल.” काजोलकडे बघत ट्विंकलने पुढे म्हटलं, “आमचा एक एक्स बॉयफ्रेंड कॉमन नाही, पण आम्ही त्याचं नाव घेऊ शकत नाही.” यावर काजोल घाबरत म्हणाली, “मी तुला विनंती करते, गप्प बस.” हे ऐकल्यानंतर सर्वजण हसू लागले.
सर्वजण नंतर रोमान्सबद्दल बोलत असतात. तेव्हा क्रिती सेनॉन तिच्या क्रशबद्दल सांगते आणि स्वतः खूप रोमँटिक असल्याची कबुली देते. “तो जो कोणी आहे, या इंडस्ट्रीतील नाही, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. मला रोमान्स आवडतो. मला प्रेमात असण्याची कल्पना फार आवडते. मला प्रेमकथा देखील खूप आवडतात,” असं क्रिती सेनॉन म्हणाली.
कबीर बहियाला डेट करतेय क्रिती सेनॉन
क्रिती सेनॉन मागील काही काळापासून तिच्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत आहे. क्रिती उद्योगपतीच्या मुलाला डेट करतेय. क्रितीच्या कथित बॉयफ्रेंडचं नाव कबीर बहिया आहे. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. १९९९ मध्ये जन्मलेला कबीर क्रितीपेक्षा १० वर्षांनी लहान आहे. क्रितीने तिचा यंदाचा वाढदिवस कबीरबरोबर साजरा केला होता.
कोण आहे कबीर बहिया?
कबीर बहियाचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. तो बिझनेसमन कुलजिंदर बहिया यांचा मुलगा आहे. त्याने इंग्लंडमधून त्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. कबीर वर्ल्डवाइड एव्हिएशन अँड टूरिझम लिमिटेडचा संस्थापक आहे. त्याच्या वडिलांची परदेशात ट्रॅव्हल एजन्सी आहे. २०१९ च्या संडे टाइम्स रिच लिस्टमधील माहितीनुसार, कुलजिंदर व त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ४२७ मिलियन पाउंड आहे.
