९०च्या दशकात अभिनय व लाघवी सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे काजोल. ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’,’ इश्क’ अशा चित्रपटांतून काजोलने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही काजोल सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

काजोल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्टबाबत ती पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती देत असते. अनेकदा काजोल कुटुंबियांबरोबरचे फोटोही शेअर करताना दिसते. नुकतंच काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लेक न्यासाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये न्यासाने डीप नेक गाऊन परिधान करत ग्लॅमरस लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा>> “पॉर्न वेबसाईटवर न्यूड फोटो…” प्रसिद्धी अभिनेत्रीला निर्मात्यांकडून धमकीचे मेल, गंभीर आरोप करत म्हणाली “माझं अकाऊंट हॅक…”

हेही वाचा>> Video: “कुठे गेली हडळ?”, ‘घर बंदूक बिरयानी’मध्ये हटके भूमिकेत दिसणार नागराज मंजुळे, व्हिडीओत दिसली झलक

काजोलने शेअर केलेल्या न्यासाच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेकांनी न्यासाच्या या फोटोवर कमेंटही केल्या आहेत. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नीना कुलकर्णींनाही काजोलने शेअर केलेल्या न्यासाच्या या फोटोंवर कमेंट करण्याचा मोह आवरता आलेला नाही. या फोटोंवर कमेंट करत त्यांनी “काजोल, न्यासा खूप सुंदर” असं म्हणत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

हेही वाचा>> “मी दोन वेळा पोलीस भरतीसाठी…” आकाश ठोसरचा खुलासा, म्हणाला “सैराटनंतर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
neena kulkarni commented on kajol photo

दरम्यान, काजोलने १९९९ साली बॉलिवूड अभिनेता अजय देवगणशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांना न्यासा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे.