Kamal Hassan Refuses To Marry Sridevi : काही कलाकार इतका सहज सुंदर अभिनय करतात की, ते प्रेक्षकांना आपलेसे करून टाकतात आणि त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडते की, ते कलाकार खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार आहेत, असं त्यांना वाटू लागतं.
असंच काहीसं घडलेलं दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन व बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बाबतीत. परंतु, तुम्हाला माहृीत आहे का कमल हासन ,यांनी श्रीदेवी यांच्याबरोबर लग्न करायला नकार दिला होता. महत्त्वाचं म्हणजे स्वत: श्रीदेवी यांच्या आईचीही अशीच इच्छा होती की या दोघांनी खऱ्या आयुष्यातही लग्न करावं; परंतु तसं काही झालं नाही.
कमल हासन यांनी ‘या’ कारणामुळे श्रीदेवी यांना दिलेला नकार
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार कमल हासन यांनी या लग्नासाठी नकार दिला होता. कमल हासन म्हणाले होते की, श्रीदेवी यांच्या आई राजेश्वरी यांनी अनेकदा ही इच्छा व्यक्त केली होती. परंतु, ते श्रीदेवी यांना त्यांच्या लहान बहिणीप्रमाणे समजायचे म्हणून त्यांनी श्रीदेवींकडे कधी वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही. ते असंही म्हणालेले की, श्रीदेवी व त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्वक संबंध असून, अभिनेत्रीलाही त्यांच्याबद्दल असंच वाटतं.
कमल हासन म्हणालेले की, श्रीदेवी त्यांना कायम सर म्हणायच्या. त्या कायम आदराने वागायच्या आणि एक चांगल्या सहअभिनेत्री होत्या. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार कमल हासन व श्रीदेवी यांनी पहिल्यांदा १९७६मध्ये ‘मुंद्रू मुंडिचू’ (Moondru Mudichu) या चित्रपटातून एकत्र काम केलं होतं. श्रीदेवी व कमल हासन यांनी ‘सदमा’, ‘सिगाप्पू रोजाक्कल'(sigappu rojakkal) आणि ‘मिनदूम कोकिळा’ (Meendum kokila) यांसारख्या चित्रपटांत काम केलं होतं.
दरम्यान, श्रीदेवी यांनी पुढे निर्माते बोनी कपूर यांच्याबरोबर लग्न केलं. बोनी कपूर यांचं हे दुसरं लग्न होतं. श्रीदेवी व बोनी यांचा प्रेमविवाह होता. या दोघांना जान्हवी कपूर व खुशी कपूर अशा दोन मुली आहेत, ज्या आता अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख विर्माण करू पाहत आहेत.
