अभिनेत्री कंगना रणौत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. बॉलिवूडमधील एखादा वाद असो वा राजकीय विषय ती आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसते. महिलां संबंधीत विषयांवर बोलणंही कंगनाला आवडतं. याबाबत ती आपलं ठाम मत इतरांसमोर मांडते. आतादेखील तिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे महिलांच्या कपडड्यांवरून आपलं मत मांडलं आहे. महिलांनी कोणते कपडे परिधान करावे किंवा करू नये यावरून बऱ्याचदा लोक आपलं मत मांडताना दिसतात. आता यांनाच कंगनाने स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – “मासिक पाळीत होणारा रक्तस्राव मी लाडूमध्ये…” ‘त्या’ आरोपांबाबत कंगना रणौत स्पष्टच बोलली, काळ्या जादूबाबतही केलं भाष्य

कंगनाने पांढऱ्या रंगाचा पारदर्शक टॉप परिधान केलेला फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. मध्यंतरी तिला याच लूकवरून बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. तिने कसे कपडे परिधान केले पाहिजे हा सल्ला तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी दिला होता. आता पुन्हा एकदा याविषयावर तिने भाष्य केलं आहे.

कंगना म्हणाली, “स्त्रिया कोणते कपडे परिधान करतात किंवा कोणते कपडे परिधान करण्यास विसरतात हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे. हा तुमचा विषय नाही.” पुढे आणखी एक फोटो शेअर करत ती म्हणाली, “मला जे बोलायचं आहे ते मी बोलले आहे. आता मी ऑफिसला जाऊ शकते.” कंगनाने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – Video : प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेचा रोमान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून अभिनेत्रीच्या नवऱ्याने केलेली कमेंट चर्चेत

कंगनाचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. कंगनाने मध्यंतरी पारदर्शक ड्रेस परिधान करत फोटोशूट केलं होतं. तिचा हा नवा लूक पाहून सारेजण अवाक् झाले होते. यावेळी तिला ट्रोलिंगचाही बराच सामना करावा लागला. पण याकडे दुर्लक्ष करत तिने ट्रोलर्सना स्पष्ट शब्दांमध्ये पुन्हा एकदा उत्तर दिलं आहे.