बॉलीवूडची क्वीन कंगना रणौत अभिनयासह तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती अनेक विषयांवर तिची मतं मांडत असते. लवकरच तिचा ‘इमर्जेन्सी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. कंगना नेहमीच राजकीय विषयांवर आपले मत मांडत असते. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत तिने राजकीय प्रवेशाबाबत वक्तव्य केले आहे.

कंगनाने याअगोदर अनेकदा राजकारणात येण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंगनाने राजकीय प्रवेशाबाबत मत व्यक्त केले होते. ती म्हणाली होती “जर भगवान कृष्णाची इच्छा असेल तर मी लोकसभा निवडणुकाही लढवेन.”आता नुकत्याच एका मुलाखतीत कंगनाने पुन्हा एकदा राजकीय प्रवेशाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

सध्या कंगना ‘इमर्जेन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान एका मुलाखतीत तिला तुला देशाची पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत कंगना म्हणाली, ‘मी ‘इमर्जेन्सी’ नावाचा एकच चित्रपट केला आहे. तो चित्रपट पाहिल्यानंतर मी पंतप्रधान व्हावे असे कोणालाच वाटणार नाही. ‘इमर्जेन्सी’ हा आपल्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आणि काळा अध्याय आहे. ज्याबद्दल आपल्या भारतातील तरुणांना माहीती असावं असं मला वाटतं.”

हेही वाचा- लग्नबंधनात अडकणाऱ्या जॅकी भगनानीचं रितेश देशमुखच्या कुटुंबाशी आहे खास नातं; काय ते जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर कंगना मोठ्या प्रमाणात सक्रिय असते निरनिराळे व्हिडीओ व फोटो पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. गेल्याच महिन्यात म्हणजे २२ जानेवारीला कंगनाने अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली होती. एवढच नाही तर अयोध्येतील एका मंदिरात झाडू मारतानाही पहायला मिळाले होते. सोहळ्यादरम्यानचे तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते