कंगना रणौत सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करीत असते. ती कधी वादग्रस्त विधाने तर कधी पोस्टच्या माध्यमातून कोणाचे तरी कौतुक करीत असते. बऱ्याचदा कंगना देशातील महत्त्वाच्या समस्यांबद्दल भाष्य करते, याबरोबरच ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची मते बिनधास्त आणि परखडपणे मांडत असते. कंगनाच्या याच गुणांमध्ये अनेकदा तिला अडचणींचा सामना करावा लागला आहे. हिंदुत्व आणि राजकीय विषयांवर भाष्य करणे कंगना रणौतला चांगलेच महागात पडले होते. खुद्द कंगनाने पोस्ट करीत याबाबत खुलासा केला आहे.
हेही वाचा- कतरीना कैफने नवऱ्याकडे केली होती ‘या’ महागड्या गोष्टीची मागणी; किंमत ऐकून विकी कौशल म्हणाला…
खरे तर, कंगना रणौतने अलीकडेच इलॉन मस्कच्या पोस्टवर तिच्या प्रतिक्रियेत लिहिले आहे की, हिंदुत्वावर वक्तव्ये केल्यामुळे आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य केल्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे. तिला अनेक ब्रॅण्डमधून वगळण्यात आले. त्यामुळे तिचे सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कंगना रणौतने ॲलन मस्कीची एक बातमी शेअर केली आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘मला जे पाहिजे ते मी बोलेन, जरी मला आर्थिक नुकसान सहन करावे लागले तरी.’ हे विधान शेअर करताना कंगनाने लिहिले की खरे स्वातंत्र्य आणि यशाचे चरित्र. हिंदुत्वासाठी बोलणे, राजकारणी, देशद्रोही, तुकडे गॅंग, यांच्या विरोधात वक्तव्ये केल्यामुळे त्यांनी मला एका रात्रीतून २० ते २५ ब्रॅण्डच्या जाहिरातींमधून काढून टाकले.
कंगनाने पुढे लिहिले की, यामुळे मला दरवर्षी ३० ते ४० कोटी रुपयांचे नुकसान होते. हे सगळे माझ्या बाबतीत झाले असले तरी मला जे बोलायचे आहे ते बोलण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. पोस्टमध्ये कंगनाने इलॉन मस्कचे कौतुक केले आणि म्हटले की प्रत्येक जण आपली कमजोरी दर्शवतो. निदान श्रीमंतांनी तरी पैशाचा विचार करू नये.
कंगनाच्या वर्कफ्रण्टबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘चंद्रमुखी-२’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पी. वासू यांनी केले असून हा चित्रपट १५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘चंद्रमुखी-२’ हा २००५ मध्ये आलेल्या तमिळ क्लासिक चित्रपट ‘चंद्रमुखी’चा सिक्वेल आहे. याशिवाय ती ‘इमर्जन्सी’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘तेजस’ चित्रपटातही दिसणार आहे.