‘डबल एक्सएल’ हा चित्रपट बॉडी शेमिंग या गंभीर विषयावर मजेशीरपणे भाष्य करतो. सोनाक्षी आणि हुमाचा ‘डबल एक्सएल’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींना हा टीझर पाहून मराठी अभिनेत्री प्रिया बापट आणि सई ताम्हणकर यांच्या वजनदार चित्रपटाची आठवण झाली. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून कित्येक कलाकारांनी बॉडी शेमिंगचा अनुभवही शेअर केला होता.

आता माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांनीसुद्धा या विषयासंदर्भात खुलासा केला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार या चित्रपटाचं एक खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं तेव्हा रोमीदेखील तिथे उपस्थित होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी तरुणपणी त्यांना आलेल्या बॉडी शेमिंगच्या अनुभवाबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

आणखी वाचा : हिमेश रेशमियाच्या नव्या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांनी लावला कपाळाला हात; म्हणाले…

चित्रपटाचं कौतुक करताना रोमी हुमा आणि सोनाक्षी यांना उद्देशून म्हणाल्या, “तुम्ही माझं आयुष्य पडद्यावर जगला आहात. मी जेव्हा कपिलला भेटले तेव्हा मीदेखील अशीच जाड होते. मला वाईट वाटायचं जेव्हा आमचा साखरपुडा झाला तेव्हा लोक मला आँटी म्हणायचे. मी हे सगळं अनुभवलं आहे, मला हा चित्रपट प्रचंड आवडला आहे. चित्रपट पाहताना मी सतत कपिलला आमच्या जुन्या दिवसांची आठवण करून देत होते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘डबल एक्सएल’ ४ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये हुमा, सोनाक्षी आणि झहीर व्यतिरिक्त, या चित्रपटात क्रिकेटर शिखर धवनही झळकणार आहे. सतराम रमणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, राजेश बहल आणि अश्विन वर्दे, साकिब सलीम, हुमा कुरेशी आणि मुदस्सर अजीज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.