करण जोहर सध्या त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोच्या आठव्या सीझनमुळे चर्चेत आहे. या सीझनमध्ये शोच्या फॉरमॅटमध्ये अनेक बदल होणार आहेत, ज्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या शोमुळे आणि एकूणच कायम स्टारकिड्सची बाजू घेण्यामुळे करणला सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. या ट्रॉलर्सना तो वेळोवेळी चोख उत्तरही देत असतो.

मात्र करण एका बाबतीत खूप गोपनियता बाळगून आहे आणि ते म्हणजे त्याचे डेटिंग लाईफ. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींप्रमाणेच, करणच्याही विविध लोकांबरोबर नाव जोडले गेले आणि त्यावर बऱ्याच लोकांनी चर्चाही केल्या. नुकतंच करणने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला असून डेटिंगच्या आलेल्या अनुभवाबद्दल त्याने प्रथमच उघडपणे भाष्य केलं आहे. डेटिंग अ‍ॅपवर त्याला आलेला अनुभव शेअर केल्याने तो सध्या चर्चेत आहे.

mira road, Woman Raped, Forced to Convert to Islam, case register against Six Accused, with obscene pictures money extorted, naya nagar police, mira road news, crime news, police,
तरूणीवर बलात्कार, केस कापून केले विद्रुप; मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा आरोप
Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!

आणखी वाचा : दीपिका पाठोपाठ कतरिना कैफ देखील भगव्या रंगाच्या ड्रेसमुळे चर्चेत; किंग खानच्या चाहत्यांकडून ट्रोलिंग सुरू

‘बॉलिवूड हंगामा’च्या मुलाखतीमध्ये करणला डेटिंगबद्दल जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्याने एका डेटिंग अ‍ॅपवर आपला जोडीदार शोधण्याचाही प्रयत्न केला होता. हे डेटिंग अॅप मनोरंजनविश्वातील लोकांसाठीच असल्याचंही करणला सांगण्यात आलं होतं. जेव्हा करणने या अ‍ॅपवर एखाद्या व्यक्तीला रिक्वेस्ट पाठवली तेव्हा ती रिजेक्ट झाली. या अॅपवर कुणीच करणला उत्तर दिलं नाही.

एकूणच बऱ्याचदा नकार आल्याने करणच्या मनात एक शंका आली ती म्हणजे तो ज्यांच्याशी जोडू इच्छित होता त्यांना कदाचित करणचे अकाऊंट हे खरे वाटत नसेल आणि म्हणूनच त्यांनी करणला उत्तर दिलं नसेल. त्यानंतर करणने डेटिंग अ‍ॅपला रामराम ठोकला. मीडियाशी याबाबतीत संवाद साधताना करण म्हणाला, “वास्तविक जीवनात कायम नकार आल्याने मी त्या अॅपचा वापर करायचं बंद केलं. कायम नकार आल्याने मला तिथे तुच्छतेची वागणूक मिळत असल्याची भावना मनात आली.”

आणखी वाचा : भाईजानचा ‘स्वॅग’, कतरिनाचा ग्लॅमरस अंदाज; ‘टायगर ३’मधील ‘लेके प्रभू का नाम’ आले प्रेक्षकांच्या भेटीला

करण जोहर २०१७ मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचा वडील झाला. करणला एक मुलगी रुही आणि मुलगा यश आहे. करण अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे फोटोज शेअर करत असतो. लवकरच आता ‘कॉफी विथ करण’च्या नव्या सीझनमध्ये कोणते पाहुणे येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.