scorecardresearch

Premium

मुंबई का आवडते? करीना कपूरने सांगितलं खरं कारण; म्हणाली “मला या शहरात…”

करीना लवकरच ‘जाने जान’ या चित्रपटातून ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. ‘कहानी’सारखा चित्रपट देणारे सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे

why-kareena-loves-mumbai
फोटो : सोशल मीडिया

कपूर घराण्याचा वारसा पुढे नेणारी अन् सध्याच्या काळातील आघाडीची अभिनेत्री करीना कपूर ही कायम चर्चेत असते. इंडस्ट्रीमधील गॉसिप गर्ल अशी ओळख असणारी करीना ही आता लवकरच ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. याआधी आमिर खानबरोबरचच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात करीना झळकली, चित्रपटाला बॉयकॉटचा सामना करावा लागला परंतु करीनाच्या अभिनयाची प्रशंसा झाली.

करीनाने नुकतीच ‘इंडियन एक्सप्रेस’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये करीनाने चित्रपटक्षेत्रातील तिचा आजवरचा प्रवास अन् तिला आलेले अनुभव याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. या मुलाखतीमध्ये करीनाला बरेच प्रश्न विचारले गेले. यापैकी रॅपिड फायर राऊंडदरम्यान तिला प्रश्न विचारण्यात आला की आपल्या कुटुंबाबरोबर तिला भारताबाहेरील कोणत्या शहरात राहायला आवडेल?

aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा
Shivrayancha Chhava Movie Review
Shivrayancha Chhava Movie Review : अतिरंजक शौर्यगाथा
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”
lal-salaam-trailer
Lal Salaam Trailer: धर्म, राजकारण व खेळाचं अनोखं मिश्रण असलेला रजनीकांत यांच्या बहुचर्चित ‘लाल सलाम’चा ट्रेलर प्रदर्शित

आणखी वाचा : सैफ अन् आपल्या वयातील अंतरावर करीना कपूरचं हटके उत्तर; म्हणाली “तो आजही तितकाच हॉट…”

यावर उत्तर देताना करीना म्हणाली, “सध्या बरेच पर्याय उपलब्ध आहेत, पण खरं सांगायचं झालं तर मला जितकी सहजता आणि मोकळेपणा मुंबईत राहताना मिळतो तसं इतर ठिकाणी मिळणं अशक्य आहे. या शहरात मला फार सुरक्षित वाटतं अन् मला मानसिक शांतता फक्त याच शहरात मिळते. त्यामुळे दुसरीकडे कुठे राहायचा विचारही करू शकत नाही.”

करीना लवकरच ‘जाने जान’ या चित्रपटातून ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. ‘कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात करीनाबरोबर विजय वर्मा आणि जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करीनाच्या वाढदिवशी म्हणजेच २१ सप्टेंबरला ‘जाने जान’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kareena kapoor explains why she likes to stay in the city of mumbai at express adda avn

First published on: 11-09-2023 at 21:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×