बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही कायम चर्चेत असते. चित्रपट असो किंवा वैयक्तिक आयुष्य करीनाबद्दल तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता असते. शिवाय कपूर परिवाराची टी सदस्य असल्याने कायमच त्यांच्याबद्दल एक वेगळी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात तयार झाली आहे. याबरोबरच करीनाची दोन्ही मुलं तैमुर आणि जहांगीर यांचीसुद्धा सोशल मीडियावर कायम चर्चा असते.

करीना आणि सैफ त्यांच्या मुलांसह सध्या लंडनमध्ये ख्रिसमस साजरी करत आहेत. त्यांचे फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे इथे कपूर परिवाराबरोबर होणारं ख्रिसमस सेलिब्रेशन मिस करत असल्याचं करीनाने स्पष्ट केलं. भाऊ कुणाल कपूरच्या घरी आयोजीत करण्यात आलेल्या ख्रिसमस पार्टीत कपूर परिवारातील बहुतेक सगळ्यांनी हजेरी लावली. नुकतंच करीनाने एका व्हिडिओमधून कपूर परिवारातील प्रत्येक सदस्याला आवडणाऱ्या एका पदार्थाचा उल्लेख केला होता.

आणखी वाचा : २०१७ मधील लैंगिक गैरवर्तन प्रकरणात ‘पिचर्स’फेम अरुणभ कुमारची निर्दोष सुटका; मुंबई न्यायालयाचा निकाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका मुलाखतीत करीनाला प्रश्न विचारण्यात आला की, कपूर परिवारासाठी काय महत्त्वाचं आहे खाणं की अभिनय? या प्रश्नाचं उत्तर देताना करीनाची स्वतःची द्विधा मनस्थिति झाली. करीना म्हणाली, “हा खरंच खूप कठीण प्रश्न आहे. कपूर परिवारातील प्रत्येकाच्या आयुष्यात या दोन्ही गोष्टींना सर्वात महत्त्वाचं स्थान आहे.” शिवाय असा कोणता पदार्थ आहे जो फुडी कपूर परिवाराला एकत्र आणतो, यावर उत्तर देताना करीना म्हणाली, “बघायला गेलं तर आम्ही जेव्हा सगळे एकत्र भेटतो तेव्हा आम्हा सगळ्यांना ‘पाया’ ही डिश प्रचंड आवडते. त्यात ग्रेव्ही, करी दोन्ही असतं आणि त्यावर ताव मारायला आम्ही सगळेच नेहमी तयार असतो.”

करीनाने नुकतंच आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये मुख्य भूमिका साकारली. चित्रपट जरी आपटला असला तरी तिच्या कामाची प्रशंसा झाली. करीना सध्या दिग्दर्शक हंसल मेहता आणि सुजॉय घोष यांच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. याबरोबरच क्रीती सनॉन, तब्बू यांच्याबरोबर आणखी एका चित्रपटात करीना झळकणार आहे.