हिंदुत्व हा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. करण राजदान दिग्दर्शित ‘हिंदुत्व चॅप्टर वन – मैं हिंदू हूं’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. कतेच या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले, त्यादरम्यान अनेक लोक चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचले होते. यामध्ये करणी सेनेचे अध्यक्ष सुरजित सिंह राठोड यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला ते एका मुस्लिम मित्राबरोबर गेले होते.
चित्रपट संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा चित्रपट बघून ते भावुक झाले होते. चित्रपटाबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले ‘चित्रपट पाहून माझा मित्र रडू लागला’ असे उत्तर दिले. एवढेच नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांनी चित्रपट निर्मात्याची भेट घेऊन त्यांचे आभार ही मानले.ते पुढे म्हणाले ‘मी हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, आमच्यात कुठे वाद आहे? आम्ही एकत्र उठतो नसतो एकटाच नव्हे तर एकत्र खातो पितो. चित्रपट बघताना हा रडायला लागला आणि मला म्हणाला, काय चित्रपट बनवला आहे’.
MeToo चे आरोप असलेल्या साजिद खानवर उर्फी जावेदने व्यक्त केला संताप, म्हणाली “त्याने ज्या मुलींचा…”
चित्रपटाच्या कथेबद्दल ते म्हणाले ‘चित्रपटात दाखवण्यात आलेली आजची युवा पिढी ज्यांना चिथावून त्यांचेच नुकसान केले जाते. ज्यांना आपले भविष्य घडवायचे आहे असे लोक कधी कधी भरकटतात आणि त्याचा आमच्या एकता आणि बंधुत्वावर मोठा प्रभाव पडतो’. हा चित्रपट सर्व तरुणांनी पाहावा असे आवाहन त्यांनी केले आहे’.
या चित्रपटात अनुप जलोटा, आशिष शर्मा, सोनारिका भदौरिया, अंकित राज यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे, ज्यांना दलेर मेहंदी, मधुश्री, अनूप जलोटा, दिव्या कुमार आणि मास्टर सलीम या गायक आणि संगीतकारांनी संगीत दिले आहे.