बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट चांगली कमाई करत आहे. बहुतांश चित्रपट समीक्षकांनी सुद्धा कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’चित्रपटाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : “दोन मुलांनी माझा पाठलाग केला अन्…”, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

‘सत्यप्रेम की कथा’चित्रपटाला मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद पाहून कार्तिक-कियाराने आनंद व्यक्त करत मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटातील “आज के बाद…” हे गाणे सध्या प्रचंड लोकप्रिय लोकप्रिय झाले आहे. चित्रपटात मन भारद्वाज आणि तुलसी कुमार यांनी हे गाणे गायले आहे. मात्र, ऑफस्क्रीन कार्तिक-कियाराने या गाण्यावर सूर धरला आहे. दोघांनाही या गाण्यावर फारसे चांगले गाता आलेले नाही. त्यामुळेच अभिनेत्याने या व्हिडीओला “गाणं असे गा… की, चार लोक तुम्हाला म्हणतील आता गाऊ नका” असे मजेशीर कॅप्शन देत पुढे ‘सत्तूकथा’ असे लिहिले आहे.

हेही वाचा : “गणपती बाप्पा मोरया!” ‘बाईपण भारी देवा’च्या टीमने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, कलाकारांनी शेअर केले फोटो

अभिनेता कार्तिक आर्यनने या गाण्याचा व्हिडीओ शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “गाणं नाही पण, चित्रपटात अभिनय उत्तम केला आहे.” असे म्हणत या जोडीचे कौतुक केले तर, दुसऱ्या एका युजरने “गाण्याचे शब्द बदला आणि ‘कभी मत गाना आज के बाद’ असं बोला…” अशा कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : “रोमान्स, फॅमिली ड्रामा अन् ब्रेकअप…”, रणवीर-आलियाच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कार्तिक-कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. ‘भूल भुलैया २’ सुपरहिट झाल्यानंतर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या जोडीला पुन्हा एकदा प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.२५ कोटींची कमाई केली होती. ‘लव आज कल’ आणि ‘भूल भुलैया २’ नंतर कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’हा तिसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.