Satyaprem Ki Katha trailer : ‘भूल भुलैया २’ नंतर कियारा व कार्तिकची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज झाली आहे. कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात गुजराती असलेल्या सत्यप्रेमची कथाबरोबरही प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

ट्रेलरमध्ये कार्तिक म्हणजेच सत्यप्रेमला लग्न करायचं असतं, पण मुलगी मिळत नसते. त्याचे कुटुंबीय त्याला मुलगी शोधायला सांगतात आणि नंतर त्याची भेट कथा म्हणजेच कियाराशी होते. दोघांना प्रेम होतं आणि दोघांचं लग्न होतं, पण नंतर असं काही घडतं की सत्यप्रेमचा अॅक्शन अवतार पाहायला मिळतो. या ट्रेलरमध्ये काही गाणीदेखील पाहायला मिळत आहेत. एकूणच ट्रेलरमध्ये गाणी, कॉमेडी, रोमान्स व अॅक्शन या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्तिक व कियाराची जोडी यापूर्वी ‘भूल भुलैया २’ मध्ये दिसली होती. तेव्हा प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री खूप आवडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कार्तिक व कियारा सत्यप्रेम व कथा म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गजराज राव व सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वान्सने केलं आहे.