हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांनी पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी सोशल मीडियावर सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.

अभिनेता कार्तिक आर्यननेसुद्धा त्याच्या सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून सतीश कौशिक यांना आदरांजली दिली आहे. स्ट्रगलिंगच्या काळात सतीश कौशिक यांनी कार्तिकला बरीच मदत केल्याचंसुद्धा अभिनेत्याने त्याच्या या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
jaya bachchan opens up on relationship with amitabh bachchan
जया बच्चन यांनी बिग बी यांच्याबरोबरच्या नात्याबाबत केला खुलासा, नातीच्या शोमध्ये म्हणाल्या, “माझे पती…”

आणखी वाचा : ‘बिग बी यांच्या आईच्या भूमिकेसाठी विचारणाऱ्या आर बल्की यांना विद्या बालनने काढलं होतं वेड्यात; अभिनेत्रीचा खुलासा

सतीश कौशिक यांचा डॅशिंग अंदाजातील फोटो शेअर करत कार्तिकने लिहिलं की, “उत्कृष्ट अभिनेता, उत्तम माणूस आणि स्ट्रगलिंग काळात आम्हाला मदत करणारा आणि भाड्यावर राहत असूनही अजिबात त्रास न देणारा घरमालक. तुमचे प्रेरणादायी शब्द आणि तुमचं मनमुराद हसणं हे कायम आमच्या स्मरणात असेल सतीश कौशिकजी.”

kartik aaryan social media post
kartik aaryan social media post

२०१९ मध्ये ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कार्तिकने त्याच्या स्ट्रगलिंग काळाबद्दल खुलासा केला होता. सतीश कौशिक यांनी त्या काळात बऱ्याच कलाकारांना मदत केली होती. त्यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘तेरे नाम’ आणि कागजसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तर ‘मिस्टर इंडिया’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘मिस्टर और मिसेज खिलाड़ी’, ‘दिवाना मस्ताना’, ‘बड़े मियां छोटे मियां’,सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आजही त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि सदैव राहतील.