बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलीकडेच ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली होती. या चित्रपटात कार्तिक बरोबर कियारा अडवाणी मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये कपिलने कार्तिकला काही भन्नाट प्रश्न विचारले या सगळ्या प्रश्नांना कार्तिकने मजेशीर उत्तरे दिली आहे.

हेही वाचा : Video : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने कुटुंबीयांबरोबर केलं एकत्र लंच; नेटकरी म्हणाले, “दोघांच्या घरी लगीनघाई…”

कपिलने कार्तिक आर्यनला त्याच्या फॅन्सबद्दल प्रश्न विचारले असता, कार्तिक म्हणाला, “माझे खरंच खूप फॅन्स आहेत.” यावर कपिल शर्मा कार्तिकला म्हणतो अनेक मुली तुझ्या प्रेमात आहेत असं आम्ही ऐकलंय याला उत्तर देताना कार्तिक म्हणतो, “फक्त मुलीच नाही तर काही मुलं सुद्धा माझ्या प्रेमात आहेत.” अभिनेत्याचे हे उत्तर ऐकून कियारा अडवाणी मोठ्याने हसू लागते. कपिल शर्मा विचारतो काय मुलं पण? “तेव्हा हो साहेब आता तुम्हाला कसे सांगू मी…” कार्तिकचे हे उत्तर ऐकून उपस्थित सगळेजण हसू लागतात.

हेही वाचा : Video : “सीतेची भूमिका संपल्यावर पुन्हा असे कपडे…” ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे ‘आदिपुरुष’ फेम क्रिती सेनॉन ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा ‘सत्य प्रेम की कथा’ हा चित्रपट २९ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. कार्तिक-कियाराने यापूर्वी ‘भूल भुलैया २’ चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘सत्य प्रेम की कथा’ चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वांसने केले आहे. यामध्ये कार्तिक ‘सत्यप्रेम’, तर कियारा ‘कथा’ची भूमिका साकारणार आहे.