शुक्रवारी आयुष्मान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ (Doctor G) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या दोन दिवसांनंतर या चित्रपटाने ९ कोटी रुपये कमावले आहेत. दरम्यान चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या आनंदात आयुष्मानने त्याच्या घरी दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला रितेश देशमुख, त्याची पत्नी जेनेलिया, रकुल प्रीत सिंह, क्रिती सेनॉन यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आयुष्मान खुरानाच्या घरच्या पार्टीमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनही उपस्थित होता. या पार्टीमध्ये त्या दोघांनी सोबत व्हिडीओ काढून तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये कार्तिक हातात ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन उभा आहे. त्याच्या हातातले पैसे पाहून शेजारी असलेला आयुष्मान म्हणतो, “हा माणूस फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही, तर दिवाळीमधल्या पत्त्यांच्या खेळामध्येही जास्त पैसे कमावतो. एवढे पैसे कोणाला मिळायला हवेत, कोणता चित्रपट प्रदर्शित झाला आहे?” त्या प्रश्नाचे उत्तर देताना कार्तिक “माझ्या मते, डॉक्टर जी या चित्रपटाला मिळायला हवेत. तर जवळच्या आणि लांबच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा अशी मी सर्वांना आवाहन करतो”, असे म्हणतो.

आणखी वाचा – एकेकाळी मुंबईत ड्रायव्हर होता ‘कांतारा’चा मुख्य अभिनेता; निराश होऊन गावाला गेलं अन्…

हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. एका चाहत्याने दोन सुपरस्टार्स एका व्हिडीओमध्ये अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजरने इतके पैसे पाहिल्यावर ई़डीची रेड पडेल असे गंमतीने म्हटले आहे. या व्हिडीओला आयुष्मानने ‘डॉक्टर जीने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करायला हवी असे या माणसाला वाटते’, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – “तेव्हा मलाही…” अवधूत गुप्तेने सांगितला मुंबई लोकल प्रवासाचा अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाद्वारे आयुष्मानने देशभरातील पुरुष स्त्रीरोगतज्ञांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटामध्ये रकुल प्रीत सिंह, शैफाली शहा आणि शीबा चड्ढा या कलाकारांनी काम केले आहे. अनुभूती कश्यप यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.