scorecardresearch

Premium

‘ZNMD’च्या सीक्वलबद्दल कतरिना कैफचं मोठं विधान म्हणाली, “आम्ही सगळेच झोयाला…”

‘रेड सी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये नुकतीच कतरिना कैफने हजेरी लावली. यावेळी तिने या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल भाष्य केलं

katrina-kaif-znmd
फोटो : इंडियन एक्सप्रेस

फरहान अख्तरच्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटापासून तीन मित्रांची गोष्ट आणि रोडट्रीप या गोष्टी हिंदी चित्रपट वरचेवर दिसू लागल्या अन् हा जणू एक ट्रेंडच बनला. यानंतर बरेच असे चित्रपट आले पण ‘दिल चाहता है’ला टक्कर देणाऱ्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ची चर्चा आजही होताना दिसते. १२ वर्षं उलटून गेली तरी याचे चाहते या चित्रपटाची अजूनही आठवण काढतात. नुकतंच या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारी अभिनेत्री कतरिना कैफने याच्या सीक्वलबद्दल भाष्य केलं आहे.

‘रेड सी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये नुकतीच कतरिना कैफने हजेरी लावली. यावेळी तिने या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल भाष्य केलं. कतरिना म्हणाली, “आम्ही सगळेच झोयाला या चित्रपटाचा सीक्वल काढायला सांगत आहोत. केवळ त्याची चर्चा आहे म्हणून त्याखातर नव्हे तर खरंच त्या चित्रपटाचा एक उत्तम सीक्वल बनू शकतो असं मला वाटतं.”

bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
pune Protest FTII Hindutva organization National Cinema Museum I am Not the River Jhelum Screening
पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारात हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन : ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध
Sarfaraz Khan Selection in Indian Team
Sarfaraz Khan : ‘…उत्सव की तैयारी करो’, सरफराजच्या निवडीनतंर सूर्यकुमार यादवने शेअर केली खास इन्स्टा स्टोरी
sachin tendulkar s deepfake video uploaded from philippines
सचिन तेंडुलकरच्या डीप फेक चित्रफीत फिलिपिन्समधून अपलोड; ई-मेल कंपनीशी सायबर पोलिसांनी साधला संपर्क

आणखी वाचा : सुपरहीट चित्रपटातून जबरदस्त कमबॅक करणाऱ्या या अभिनेत्याला ओळखा पाहू?

कतरिनाच्या आधी झोयानेही या या चित्रपटाच्या सिक्वलबद्दल भाष्य केलं होतं. झोया म्हणाली, “हा चित्रपट आमच्यासाठी फार जवळचा आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर खरंच दुसऱ्या भागासाठी तितकं उत्तम कथानक मला सापडलं तर मी नक्की करेन. केवळ पैसे कमावण्यासाठी आम्ही दूसरा भाग करू इच्छित नाही. जेव्हा प्रेक्षक हा सीक्वल पाहायला येतील तेव्हा त्यांच्या काही अपेक्षा असतील अन् त्यांच्या त्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्या नाहीत तर त्यांचा भ्रमनिरास होईल.”

झोया सध्या तिच्या आगामी ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्यासारखे बरेच स्टारकिड्स मुख्य भूमिकांमध्ये आहेत. याबरोबरच झोया आणि फरहान मिळून ‘जी ले जरा’ या चित्रपटावरही काम करत आहेत. हा चित्रपटही ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’सारखाच असणार अशी चर्चा आहे. यात कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Katrina kaif talks about sequel of zindagi na milegi dobara avn

First published on: 06-12-2023 at 10:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×