केबीसी ज्युनिअरची सध्या चांगलीच चर्चा होते आहे. अमिताभ बच्चन हे केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपती हे गेल्या अनेक वर्षांपासून ‘होस्ट’ करत आहेत. अमिताभ बच्चन हे त्यांच्या नम्र होस्टिंगसाठी ओळखले जातात. मात्र केबीसी ज्युनिअरमध्ये एका पाचवीतल्या मुलाने अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धटपणा केला. ज्यानंतर काय घडलं तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

कौन बनेगा करोडपती १७ वा सिझन सुरु

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या १७ व्या सिझनचं होस्टिंग करत आहेत. त्यातल्या किड्स एडिशनमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. लहान मुलं त्यांच्या हुशारी आणि चाणाक्षपणाने कशी उत्तर दिलं हे सध्या दिसून येतं आहे. अशात एका भागाने आणि त्यात पाचवीतल्या मुलाने साक्षात अमिताभ बच्चन यांच्याशी केलेल्या उद्धटपणामुळे हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या मुलाने त्याच्या अति आत्मविश्वासामुळे पाचव्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं आणि त्याला काहीही जिंकता आलं नाही. या संदर्भातली क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. इशित भट्ट असं या पाचवीतल्या मुलाचं नाव आहे. त्याचा उद्धटपणा पाहून लोकही त्याच्यावर टीका करत आहेत.

काय आहे व्हायरल क्लिपमध्ये?

इशित भट्ट : मेरे को रुल्स पता है, आप मुझे रुल समझाने मत बैठना.

अमिताभ बच्चन : अच्छा (कपाळाला हात लावत)

अमिताभ बच्चन : पहला प्रश्न, इनमेंसे कौनसा भोजन आमतौर पर सुबह खाया जाता है?

इशित भट्ट : सर, ऑप्शन के बिना बोल रहा हूँ, ब्रेकफास्ट

अमिताभ बच्चन : ऑप्शन सुनिये ए लंच, बी ब्रेकफास्ट

इशित भट्ट : सर, बी ब्रेकफास्ट लॉक कर दो

अमिताभ बच्चन : टँगो, कथ्थक और ब्रेक ये किसके लोकप्रिय प्रकार है?

इशित भट्ट : सर, ऑप्शन के बिना बोल रहा हूँ डान्स. जो भी ऑप्शन है उसमेसे डान्स.

अमिताभ बच्चन : बाकी लोगो के लिये ऑप्शन बोलने पडेंगे

अमिताभ बच्चन : खेल की शतरंज की बोर्ड पर कितने राजा होते हैं?

इशित भट्ट : सर, ये भी कोई पुछने का सवाल है? दोही राजा होते हैं.

अमिताभ बच्चन : अच्छा ऑप्शन तो बोल दे, ए वन, बी टू

इशित भट्ट : सर बी टू पर ताला लगा दिजिये

अमिताभ बच्चन : अब सवाल के ऑप्शन डालने की जरुरत नहीं पडेगी क्यूँ की ये पहलेही बोल रहे हैं

इशित भट्ट : सर आप सवाल तो पुछो, सर आप सवाल तो पुछो

अमिताभ बच्चन : पाचवा प्रश्न ये रहा, वाल्मिक रामायण के प्रथम कांड का नाम क्या है?

इशित भट्ट : ऑप्शन्स (सगळे हसू लागतात.)

अमिताभ बच्चन : आपही नहीं होशियार, ये भी होशियार है

इशित भट्ट : अरे ऑप्शन डालो..

अमिताभ बच्चन : हाँ डालते हैं भय्या

इशित भट्ट : सर बी अयोध्या कांड को अच्छी तरीकेसे लॉक किया जाये

अमिताभ बच्चन : लॉक करे, शुअर हैं?

इशित भट्ट : सर एक क्या चार लॉक लगादो

अमिताभ बच्चन : बहुत जोर से बोल रहें है.. ताला लगा दे?

इशित भट्ट : अरे लॉक करो..

इशित भट्टच्या व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा

यानंतर उत्तर चुकतं आणि इशित भट्टचा आणि त्याच्या आई वडिलांचा चेहरा खर्रकन उतरतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर उद्धटपणा करणाऱ्या पाचवीतल्या मुलाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होते आहे. रामायणाशी संबंधित प्रश्न आल्यानंतर मुलाला त्याचं योग्य उत्तर देता आलं नाही. ते योग्य उत्तर त्याने उतावळेपणा न करता योग्य विचार करुन किंवा लाइफलाइन वापरुन दिलं असतं तर कदाचित त्याला २५ हजार पॉईंट्स मिळाले असते. पण काहीही न जिंकता त्याला हॉट सीट सोडावी लागली. अतिआत्मविश्वास कसा नडतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ ठरला आहे. या व्हायरल व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.