नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या आगामी चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा रंगली आहे. या चित्रपटात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल झळकणार आहे. याशिवाय रावणाच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार, ‘केजीएफ’ फेम यश दिसणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता यशने रावणाची भूमिका आणि ८० कोटींची ऑफर नाकारल्याचं समोर आलं आहे.

अलीकडेच ‘रामायण’ या चित्रपटाचं शूटिंग नितेश तिवारी यांनी सुरू केलं आहे. शूटिंग सुरू होण्यापूर्वी रणबीर कपूर ट्रेनिंग घेताना दिसला होता. इन्स्टाग्रामवर रणबीरच्या ट्रेनरने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये अभिनेता खूप मेहनत करताना दिसत होता. एकाबाजूला ‘रामायण’ चित्रपटासाठी जोरदार तयार सुरू असताना दुसऱ्या बाजूला यशने मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोच्या शूटिंगला झाली सुरुवात, अलका कुबल सेटवरील फोटो शेअर करत म्हणाल्या…

‘झूम’च्या वृत्तानुसार, ‘रामायण’ चित्रपटात यश रावणाच्या भूमिकेत दिसणार नाहीये. एका सूत्राने सांगितलं, यशने रावणाची भूमिका नाकारून फक्त निर्माता म्हणून चित्रपटाचं काम पाहणार आहे. अभिनेत्यानं ८० कोटींची ऑफर नाकारली आहे. त्यामुळे आता यश ‘रामायण’ चित्रपटात निर्मात्याच्या भूमिकेत असणार आहे.

हेही वाचा – दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंच्या मुलाचं पार पडलं व्याही भोजन, लवकरच अडकणार लग्नबंधनात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनुसार, ‘रामायण’मधील कुंभकरणाच्या भूमिकेसाठी अभिनेता बॉबी देओलशी संपर्क केला आहे. पण अजूनपर्यंत हे निश्चित झालेलं नाही. तसंच रावणाचा छोटा भाऊ विभीषणची भूमिका अभिनेता विजय सेतुपति साकारू शकतो. याशिवाय लारा दत्ता, शीबा चड्ढा देखील ‘रामायण’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. लारा कैकेयी तर शीबा मंथराची भूमिका साकारणार आहे. बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपट दिवाळी २०२५मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.