Khushi Kapoor Vedang Raina Video: बोनी कपूर व श्रीदेवी यांची धाकटी लेक तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. जान्हवीची बहीण खुशी कपूर अभिनेता वेदांग रैनाला डेट करतेय. खुशी व वेदांगचा सोनम कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

खुशी व वेदांग दोघांनी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाच्या रिलीजपासून वेदांग व खुशी एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात होतं. नंतर अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात या दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. त्याचबरोबर दोघेही अनेकदा एकाच लोकेशनवरचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. एकमेकांच्या पोस्टवर कमेंट्स करतात. इतकंच नाही तर खुशीने वेदांगच्या नावाचं पेंडंटही घातलं होतं. पण आता हे दोघे त्यांच्या भांडणामुळे चर्चेत आहेत.

खुशी व वेदांगचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांशी काहीतरी गंभीर विषयावर बोलताना दिसत आहेत. याचदरम्यान वेदांग खुशीचा हात घरतो, पण ती त्याच्या हातातून हात सोडवून तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते. यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू असल्याचं दिसतं. इन्स्टंट बॉलीवूडने त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ –

हा व्हिडिओ अनिल कपूरच्या मुंबईतील जुहू येथील घराचा आहे. अभिनेत्री सोनम कपूरचा वाढदिवस असल्याने जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला स्वरा भास्करपासून ते करीना कपूरपर्यंत अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पण वेदांग व खुशीच्या भांडणाच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

खुशी कपूर आणि वेदांग रैना बोलत असतात, मधेच खुशी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते, पण वेदांग तिचा हात धरतो आणि तिला जाऊ देत नाही. वेदांग खुशीशी बोलतो, तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर खुशी घराबाहेर उभ्या असलेल्या एका आलिशान कारमध्ये बसते आणि निघून जाते. काही वेळाने वेदांग देखील पार्टीतून बाहेर पडतो आणि तोही तिथून निघून जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जान्हवी कपूर सध्या शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, तर खुशी वेदांग रैनाला डेट करतेय. श्रीदेवी व बोनी कपूर यांच्या दोन्ही लेकी त्यांच्या लव्ह लाइफमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात.