बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नाला एक महिना झाला आहे. दोघांचा लग्नानंतरचा होळी हा पहिलाच सण आहे. आज होळीच्या सणानिमित्त कियारा अडवाणीने हळदीचे फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांनी ७ फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड किल्ल्यावर एका खासगी समारंभात लग्नगाठ बांधली होती.

Video: दुबईहून भारतात परतलेली राखी सावंत ढसाढसा रडू लागली; आदिलचा उल्लेख करत म्हणाली, “याच जागेवर…”

“माझ्याकडून आणि माझ्या प्रेमाकडून तुम्हाला आणि तुमच्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा” असं कॅप्शन देत कियाराने सिद्धार्थला टॅग करत हळदीचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना हळद लावताना दिसत आहेत. कियाराच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करत या नवविवाहितांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​पहिल्यांदा ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र दिसले होते आणि येथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. मात्र, दोघांनीही आपलं नातं कधीच सार्वजनिक केलं नव्हतं. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि फेब्रुवारी महिन्यात त्यांनी लग्नगाठ बांधली होती.