बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे ही सध्या चर्चेत आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात पूजा आता झळकणार आहे. बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या सुपरस्टारबरोबर चित्रपटात झळकणार असल्याने तिची चर्चा आहे. याआधी पूजा ही रोहित शेट्टी आणि रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता.

‘सर्कस’च्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल नुकतंच पूजाने भाष्य केलं आहे. सिद्धार्थ कन्नन या यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूजाने ‘सर्कस’च्या अपयशाबद्दल सांगितलं की, “होय मी चित्रपटाच्या अपयशामुळे थोडी अस्वस्थ झाले, शेवटी तो चित्रपट आम्हा कलाकारांसाठी आमच्या मुलासारखा असतो. पण त्याकडे माझा बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. त्यातून मला बरंच शिकायला मिळालं. रोहित शेट्टीसारख्या दिग्दर्शकाबरोबर मला काम करायला मिळालं, शिवाय जॉनी लिवर, संजय मिश्रा अशा दिग्गज कॉमेडीयन्ससह काम करता आलं, माझ्यासाठी या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शिवाय चित्रपटात माझ्या कामाची लोकांनी प्रशंसा केली आहे त्यामुळे याबाबतीत मी नक्कीच जिंकले आहे.”

आणखी वाचा : हृतिक रोशनच्या ‘क्रिश ४’बद्दल नवीन अपडेट; चित्रपटाच्या शूटिंगबद्दल राकेश रोशन यांचा मोठा खुलासा

पूजा हेगडेचा सर्कस हा पहिला बिग बजेट फ्लॉप चित्रपट नाही. याआधी प्रभाससह ‘राधे श्याम’ या चित्रपटातही पूजाने काम केलं आहे. या चित्रपटाचं बजेट ३०० कोटी एवढं होतं, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला बजेटचे पैसेदेखील रीकवर करता आले नाहीत. याविषयी पिंकव्हीलाच्या मुलाखतीमध्ये पूजा म्हणाली, “लोक चित्रपटात माझ्या कामाची प्रशंसा करत आहेत याबाबत मी समाधानी आहे. केवळ दिसण्यापलीकडे जाऊन माझ्या अभिनयात झालेल्या सुधारणेची लोकांनी दखल घेतली आहे, याबाबतीत मी खुश आहे.”

आणखी वाचा : ‘स्कॅम १९९२’ वेबसीरिजमधील अभिनेत्यावर आली काम मागायची वेळ; ट्विटरवरुन केली विनंती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूजा हेगडेने २०१२ साली तमिळ चित्रपटसृष्टीतून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर काही काळ दक्षिणेत काम केल्यावर २०१६ मध्ये हृतिक रोशनच्या ‘मोहेंजो दारो’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. याबरोबरच तिने सुपरस्टार चिरंजीवी, थलपती विजय यांच्याबरोबरही काम केलं आहे. आता पूजा ‘किसी का भाई किसी की जान’मधून सलमान खानबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे.