Sunita Ahuja on Govinda: काही दिवसांपासून सुनीता आहुजा आणि गोविंदा घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. सुनीता आहुजा यांनी वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज करीत त्याच्यावर गंभीर आरोपदेखील केल्याचे म्हटले जात होते.

गोविंदाचा संसार मोडल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच त्याचे वकील ललित बिंदल आणि मुलगी टीना आहुजा यांनी या चर्चा खोट्या असल्याचे स्पष्ट केले. तसेच, गोविंदाचे वकील ललित बिंदल म्हणाले की लोक जुन्या गोष्टींबद्दल बोलत आहेत. गणेश चुतर्थीला सर्व जण एकत्र दिसतील.

आता या सगळ्यात सुनीता आहुजा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आहे. गोविंदा त्यांना प्रेमाने कोणत्या टोपणनावाने हाक मारतो, याचा खुलासा सुनीता आहुजा यांनी केला आहे.

सुनीता आहुजा काय म्हणाल्या?

सुनीता आहुजा यांनी नुकतीच ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना गोविंदा त्याचे प्रेम दाखविण्यासाठी काय करतो, असे विचारण्यात आले होते. त्यावर सुनीता आहुजा म्हणाल्या, “आतापर्यंत त्यानं असं काही केलं नाही; पण तो मला प्रेमानं सोना म्हणतो. त्यानं मला सोना म्हणून हाक मारली की, मला खूप आनंद होतो. मी आनंदानं वेडी होते”, असे म्हणत गोविंदा त्यांना सोना, अशी हाक मारत असल्याचा खुलासा त्यांनी केला.

गोविंदा व सुनीता आहुजा यांनी १९८७ ला लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. टीना आणि यशवर्धन अशी त्यांची नावे आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये गोविंदाचा घटस्फोट होणार असल्याचे म्हटले जात होते. त्याचे कारण म्हणजे सुनीता आहुजा यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, गोविंदाचे वकील व मित्र ललित बिंदल यांनी स्पष्ट केले होते की, सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता; पण तो नंतर मागे घेण्यात आला. आता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे.

काही दिवसांपूर्वी यूट्यूब व्लॉगमध्ये सुनीता आहुजा महालक्ष्मीच्या मंदिरात गेल्यानंतर घटस्फोटाबद्दल बोलताना त्या रडल्या होत्या. त्या म्हणालेल्या, “माझी देवीवर श्रद्धा आहे. मी देवीच्या तिन्ही रूपांवर मनापासून प्रेम करते. परिस्थिती काहीही असो, जे कोणी माझं कुटुंब तोडण्याचा प्रयत्न करतील, त्यांना देवी माफ करणार नाही.”

दरम्यान, सुनीता आहुजा यांनी त्यांच्या व्लॉगमध्ये व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया, तसेच मुलाखतीमधील त्यांच्या वक्तव्यांची मोठी चर्चा होताना दिसते.