‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाच्या आठव्या सीझनचा पहिला भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या भागात बॉलीवूडची स्टार जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी हजेरी लावली होती. या वेळी दोघांनीही आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. प्रेम, रिलेशनशिप ते लग्न असा संपूर्ण प्रवास रणवीर-दीपिकाने या मुलाखतीत सांगितला.

हेही वाचा : ‘त्या’ दिवशी करण जोहर घरी जाऊन ढसाढसा रडलेला; ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर निर्मात्याने सांगितली दुःखद आठवण

ms dhoni suresh raina
“मी तेव्हा धोनीला सांगितलं होतं”, चार वर्षांनंतर सुरेश रैनानं ‘त्या’ प्रसंगावर केला खुलासा; IPL २०२१ वरही केलं भाष्य!
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”

दीपिकाने मानसिक नैराश्येतून सावरण्यासाठी अनेक वर्ष उपचार घेतले होते. दीपिकाबरोबर घडलेला एक प्रसंग सांगताना करण जोहर म्हणाला, “शाहरुख खानच्या वाढदिवसासाठी आम्ही सगळे अलिबागला गेलो होतो. तिकडून निघाल्यावर मी, दीपिका आणि फराह खान आम्ही तिघं एका हेलिकॉप्टरमधून एकत्र येत होतो. त्या प्रवासादरम्यान सलग २५ ते ३० मिनिटं दीपिका माझा हात घट्ट पकडून रडत होती. तिला जवळपास अर्धा तास रडताना पाहून मला खरंच वाईट वाटलं.”

हेही वाचा : लक्ष्मीकांत बेर्डेंच्या गाडीवर चढून चाहत्यांनी…; ‘एक होता विदूषक’च्या चित्रीकरणाच्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

“जेव्हा मी दीपिकाला काय झालं असं विचारलं तेव्हा तिच्याकडे कशाचंही उत्तर नव्हतं ती फक्त रडत होती. तिच्या रडण्यामागचं कारणही तिला माहीत नव्हतं. त्या क्षणी मला मानसिक त्रास काय असतो याची जाणीव झाली. अशीच एक घटना माझ्याबरोबरही अलीकडेच घडली होती तेव्हा वरुण धवनने माझी मदत केली. घरी जाऊन दुसऱ्या दिवशी मी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेतली.” असं करणने सांगितलं.

हेही वाचा : लक्ष्मीकांत बेर्डेंच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीने शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, “तुमची…”

दरम्यान, रणवीर-दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर दीपिका पदुकोण लवकरच ‘फायटर’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय रणवीर सिंह शेवटचा करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकला होता. लवकरच अभिनेता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसेल.