गेल्या काही महिन्यात मनोरंजन सृष्टीपासून लांब गेलेले लोकप्रिय गायक लकी अली पुन्हा ट्रेंडमध्ये आले. ‘ओ सनम’, ‘गोरी तेरी आंखे’ ही त्यांची लोकप्रिय गाणी पुन्हा लोकांच्या तोंडी ऐकू येऊ लागली. ९० च्या दशकात लकी अलीने यांनी त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांवर मोहिनी घातली होती. भारतात पॉप कल्चर रुजवण्यात आणि अल्बमची क्रेझ निर्माण करण्यात लकी अली यांचा मोठा वाटा आहे.

सध्या हाच गुणी गायक मात्र एका वेगळ्याच अडचणीत सापडला आहे. यासाठी त्यांनी कर्नाटकच्या डिजीपी यांच्याकडे मदत मागितली आहे. बंगळूरमधील स्वतःच्या जमिनीवर लँड माफिया बेकायदेशीररित्या ताबा मिळवल्याचा दावा लकी अली यांनी केला आहे. यासाठीच त्यांनी पोलिसांकडे मदत मागितली आहे. याविषयी त्यांनी फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे.

illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

आणखी वाचा : …म्हणून दिग्दर्शक रवी जाधवने पुन्हा केलं लग्न; पत्नीनेच पोस्ट केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा

ज्या ठिकाणी गेली ५० वर्षं त्यांचे फार्म आहे तिथे लँड माफिया जबरदस्ती घुसू पाहत असल्याची तक्रार त्याने केली आहे. या प्रकरणात स्थानिक पोलिसांकडून काहीच सहकार्य मिळत नसल्याने लकी यांनी डिजीपी यांच्याकडे याबद्दल तक्रार केली आहे. स्थानिक पोलिस उलट या गोष्टीला आणखी खतपाणी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. लँड माफिया सुधीर रेड्डी आणि मधु रेड्डी यांची नावं घेत त्यांनी याबद्दल डिजीपी यांच्याकडे मदतीसाठी विनवणी केली आहे. शिवाय सध्या ते दुबईत असल्याने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांशी संवाद साधला आहे.

जमिनीचा कायदेशीर ताबा आणि कागदपत्र ही सगळी आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचंही लकी अली यांनी स्पष्ट केलं आहे. लकी अली यांच्या पोस्टमुळे त्यांचे चाहते त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत आणि सोशल मीडियावर त्यांनीही या प्रकरणात लकी अली यांना पाठिंबा दिला आहे. सध्या लकी अली पार्श्वगायन करत नसले तरी त्यांचे लाईव्ह शोज सुरू असतात.