ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा व अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा भाऊ लव सिन्हा लवकरच ‘गदर २’ मध्ये पाहायला मिळणार आहे. त्याने २०१० मध्ये ‘सदियां’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो ‘पलटन’ चित्रपटात झळकला होता. ‘गदर २’ च्या निमित्ताने लवने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याचे वडील शत्रुघ्न सिन्हा व महानायक अमिताभ बच्चन यांच्यातील वादावर प्रतिक्रिया दिली.

“पैसे वाचविण्यासाठी ते…”, शत्रुघ्न सिन्हांच्या संघर्षाबद्दल मुलाचा खुलासा; म्हणाला, “बाबा यशस्वी झाल्यावर…

मुलाखतीत सिद्धार्थ कन्नने लव सिन्हाला त्याचे वडील आणि अमिताभ बच्चन यांच्या संबंधांबद्दल विचारण्यात आलं. एकेकाळी घट्ट मैत्री असणाऱ्या या दोघांच्या वादाचीही प्रचंड चर्चा झाली. या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांच्या शत्रुत्वाबद्दल विचारलं असता लव म्हणाला की हे घडलं तेव्हा तो खूप लहान होता. त्यामुळे त्यांच्यात काय झाले याबद्दल जास्त माहिती नाही. यावेळी तो अमिताभ बच्चन आणि त्याच्या कुटुंबाचा खूप आदर करत असल्याचं त्याने सांगितलं. तसेच अभिषेक बच्चनच्या प्रवासाबद्दल आणि त्याने गेल्या काही वर्षांत स्वतःला कसं सिद्ध केलं याबद्दलही भाष्य केलं.

प्रसिद्ध अभिनेते आहेत अमिताभ बच्चन यांचे साडू, दोघांनी दोन चित्रपटात केलंय एकत्र काम, फोटो पाहून ओळखलंत का?

“जेव्हा दोन उत्कृष्ट कलाकार असतात, तेव्हा स्पर्धा होते. पण त्यांची स्पर्धा किंवा भांडण वैयक्तिक कारणांसाठी नव्हतं. काही वेळा इतर लोक तुम्हाला एकमेकांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. पण जेव्हा तुम्हाला खरं कळतं आणि पुन्हा एकत्र येता, तीच मॅच्युरिटी असते,” असं लव म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघांनी ‘नसीब’, ‘काला पत्थर’, ‘शान’ आणि ‘दोस्ताना’ यांसारख्या अनेक चित्रपटात अमिताभ व शत्रुघ्न यांनी एकत्र काम केलं, पण काला पत्थरच्या वेळेपर्यंत दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांशी बोललेही नव्हते, असा खुलासा खुद्द शत्रुघ्न यांनी केला होता. ७० च्या दशकात शत्रुघ्न अमिताभ यांच्यापेक्षा चांगलं काम करायचे, त्यामुळे अमिताभ त्यांच्याबरोबर काम करणं टाळायचे, असंही ते म्हणाले होते. यावरूनच दोघांमध्ये वाद झाला आणि ते एकमेकांशी बोलायचे नाही. पण कालांतराने गोष्टी सुधारल्या आणि त्यांच्यातील मतभेद दूर झाले.