Bollywood Actress Madhuri Dixit : ९० च्या दशकातील ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. आजवर तिने बॉलीवूडच्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांचा लग्नसोहळा अमेरिकेत पार पडला होता. लग्नानंतर अभिनेत्री देखील परदेशातच स्थायिक झाली, २०११ मध्ये माधुरी भारतात परतली.

माधुरी दीक्षितला दोन मुलं आहेत. तिच्या मोठ्या मुलाचं नाव अरिन आहे तर, धाकट्या मुलाचं नाव रायन असं आहे. ‘धकधक गर्ल’च्या दोन्ही मुलांचं शिक्षण परदेशात पूर्ण झालं आहे. अरिन आणि रायन यांच्या संस्कारांचं देखील सोशल मीडियावर कायम कौतुक केलं जातं.

आपली आई भारतीय सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असूनही अरिन आणि रियान कधीच गर्व करत नाहीत. याबद्दलचा एक किस्सा कॉमेडियन भारती सिंगने देखील सांगितला होता. माधुरीचा लेक अरिन ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात करण जोहरला असिस्ट करत होता. त्यावेळी सुपरस्टारचा मुलगा आहे असं न दाखवता सेटवरची बहुतांश कामं अरिन खूप आवडीने करायचा असं भारतीने सांगितलं होतं.

माधुरी दीक्षितला मिळालं खास गिफ्ट

आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर माधुरीच्या दोन्ही मुलांचं कौतुक करण्यात येत आहे. यामागे खूपच खास कारण आहे. अभिनेत्रीचे पती डॉ. नेने आणि अरिन-रायन यांनी मिळून माधुरीला खास गिफ्ट दिलं आहे. ‘धकधक गर्ल’ला तिच्या दोन्ही मुलांनी नामांकित ब्रँडचे स्किन केअर प्रोडक्ट्स भेट म्हणून दिले आहेत. या गिफ्टवर दोघांनी माधुरीसाठी खास मेसेज देखील लिहिला आहे.

माधुरीची दोन्ही मुलं तिला ‘आई’ अशी हाक मारतात. “खास आमच्या आईसाठी…आमच्याकडून तुला ही गोड भेटवस्तू” असा मेसेज माधुरीच्या मुलांनी गिफ्ट पेपरवर लिहिला होता. विशेष म्हणजे ‘आई’ असं मराठीत लिहिलं असल्याचं माधुरीने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
madhuri dixit
माधुरी दीक्षितला मुलांनी दिलं खास गिफ्ट

माधुरी दीक्षित मुलांनी दिलेल्या गिफ्टचा फोटो शेअर करत म्हणते, “आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टींमधून मोठा आनंद मिळतो…आजचा दिवस माझ्यासाठी असाच आनंदी गेला.” मुलांनी दिलेलं हे गोड सरप्राइज अभिनेत्रीच्या पसंतीस उतरलं आहे.