अलीकडच्या काळात बॉलीवूड सेलिब्रिटीही मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. विराट कोहली व अनुष्का शर्मा यांनी एका कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. आता अभिनेत्री माधुरी दीक्षित, अमृता राव आणि शाहरुख खानची पत्नी व निर्माती गौरी खान यांनी गेल्या काही महिन्यांत OYO चे शेअर्स खरेदी केले आहेत.

गौरी खानने ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या सीरीज जी फंडिंग राउंडमध्ये ओयोचे २.४ मिलियन शेअर्स खरेदी केले होते. या राउंडमध्ये कंपनीने गुंतवणूकदारांकडून तब्बल १४०० कोटी रुपयांहून अधिक निधी गोळा केला, असं सूत्रांनी पीटीआयला सांगितलं.

हेही वाचा – “त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…

माधुरी दीक्षितने केली गुंतवणूक

अलीकडच्या काळात क्रीडा व सिनेविश्वातील सेलिब्रिटींचे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण त्यातून चांगला परतावा मिळतो. “माधुरी दीक्षित, तिचे पती डॉ. श्रीराम नेने आणि क्लिनीशियन डॉक्टर व फ्लेक्स स्पेस कंपनी Innov8 चे संस्थापक डॉ. रितेश मलिक यांनी ओयोचे दोन मिलियन शेअर्स खरेदी केले आहेत”, असं कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे. या गुंतवणुकीतील शेअर्सचे मुल्यांकन कंपनीने जाहीर केलेले नाही.

हेही वाचा – एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी

आणखी एक सेलिब्रिटी जोडपं अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल सूद यांनीदेखील ओयोचे शेअर्स खरेदी केले आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहलीच्या गुंतवणुकीची झालेली चर्चा

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची संपत्ती १००० कोटींहून अधिक आहे. त्याने विविध व्यवसायांमध्ये गंतवणूक केली आहे. विराट कोहलीजवळ गो डिजिटचे २,६६,६६७ शेअर्स आहेत, तर अनुष्का शर्माकडे ६६,६६७ शेअर्स आहेत. १४ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांनी ७५ रुपये प्रति शेअर या भावाने हे शेअर्स खरेदी केले होते. गो डिजिट जनरल इन्शुरन्सचे शेअर्स २०२४ मध्ये लिस्ट झाले होते. या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांना तीन महिन्यांत ४६ टक्क्यांहून अधिक नफा झाला होता.