‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे महाराष्ट्रभरात लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमामध्ये काम करणारा प्रत्येक अभिनेता अगदी प्रत्येकाला खळखळून हसवतो. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे निखिल बने. निखिल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे नावारुपाला आला. अगदी सामान्य कुटुंबातील हा मुलगा आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

आणखी वाचा – VIDEO : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता अजूनही राहतो चाळीत, शेअर केला घराचा व्हिडीओ

निखिल त्याच्या अभिनयाच्या जोरावर नावारुपाला आला. त्याने एक नवी सुरुवात केली आहे. निखिलने स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. या चॅनलद्वारे तो विविध व्लॉग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. शिवाय त्याच्या खासगी आयुष्याबाबत माहितीही देताना दिसतो. आताही त्याने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. निखिल शिमग्यासाठी त्याच्या गावी गेला होता.

निखिलचं मुळ गाव चिपळूण. शिमगोत्सव हा कोकणातील मोठा सण. निखिलच्या चिपळूण येथील गावी पालखी येणार म्हटल्यावर त्याने कामामधून ब्रेक घेतला. तसेच तो पालखीसाठी गावी गेला. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निखिल पालखी नाचवताना दिसत आहे. तसेच कोकणातील शिमगा नेमका कसा असतो याबाबत त्याने माहिती दिली आहे.

आणखी वाचा – इस्लाम धर्मासाठी बॉलिवूड सोडणारी सना खान ३४व्या वर्षी होणार आई, म्हणाली, “लवकरच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय कोकणातील नमन, खेळे याबाबतही निखिलने या व्हिडीओमध्ये संपूर्ण माहिती दिली. निखिलच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर अधिकाधिक पसंती मिळत आहे. तसेच गावामध्ये येऊन कोकणातलं प्रेक्षकांना दर्शक घडवल्याबद्दलं त्याचं कौतुकही होत आहे. बनेवाडीचा शिमगोत्सव आणि तेथील परंपरा निखिलच्या चाहत्यांनाही आवडली आहे.