Main Atal Hoon Box Office Collection Day 1 : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट १९ जानेवारी रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात दिग्गज अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

‘मैं अटल हूं’ चे दोन ट्रेलर रिलीज करण्यात आले होते. ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास दाखवतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असं वाटलं होतं. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘मैं अटल हूं’ला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे चित्रपटाची सुरुवात खूपच संथ झाली.

२१.२ मिलियन प्रेक्षकांनी २०२३ मध्ये ओटीटीवर सर्वाधिक पाहिला ‘हा’ वादग्रस्त बॉलीवूड चित्रपट; तुम्ही बघितलाय का?

‘मैं अटल हूं’ च्या रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची प्रारंभिक आकडेवारी समोर आली आहे. ‘सॅकनिल्क’ च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘मैं अटल हूँ’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त १ कोटी रुपये कमावले आहेत. ही सुरुवात नक्कीच निराशाजनक आहे. चित्रपटाचं जोरदार प्रमोशनही करण्यात आलं आहे, पण तरीही चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय.

१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून वेगळी झाली मराठमोळी अभिनेत्री, पण घटस्फोट घेणार नाही; कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मैं अटल हूं’ च्या पहिल्या दिवसाची निराशाजनक आकडेवारी पाहता आता वीकेंडला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शनिवार व रविवारी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास त्याच्या कमाईत वाढ होईल व चित्रपट पुढील काही दिवस थिएटरमध्ये टिकून राहिल. हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटर्समध्ये आकर्षित करण्यात यशस्वी होणार की नाही, हे वीकेंडनंतर कळेल.