बॉलीवूडची लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिका, चित्रपट दिग्दर्शिका, लेखक, निर्माती, डान्सर अशा सर्व भूमिका उत्तमरित्या पेलणारी अभिनेत्री म्हणजे फराह खान. फराह खान या व्यतिरिक्त उत्कृष्ट सूत्रसंचालनही करते. अलीकडेच ऑफ एअर झालेल्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा तिनेच सांभाळली होती. याशिवाय फराह सध्या तिच्या युट्यूबवरील व्हिडीओमुळे खूप चर्चेत आहे. सेलिब्रिटींच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेत असते. फराह खानबरोबर तिचा कूक दिलीपदेखील असतो. जो सध्या सगळ्यांचा लाडका झाला आहे.

अलीकडेच फराह खान मलायका अरोराच्या घरी गेली होती. यावेळी मलायकाच्या आईने ‘फिश करी’ बनवली. त्यानंतर मलायकाचं दिलीपबरोबर योगा सेशन झालं. मग मलायकाच्या आईने बनवलेल्या ‘फिश करी’चा आस्वाद घेण्यापूर्वी अभिनेत्रीने कूक दिलीपबरोबर असं काही केलं की तिचं सध्या कौतुक होतं आहे.

जेव्हा सर्वजण जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसत होते, तेव्हा मलायकाने दिलीपला देखील सर्वांबरोबर बसायला सांगितलं. पण, दिलीपला लाज वाटत होती. त्यामुळे तो डायनिंग टेबलपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. पण, मलायकाने त्याच्या हाताला पकडून खुर्चीवर बसवलं आणि म्हणाली, तुम्ही सगळ्यांबरोबर जेवण जेवाल. तरीही दिलीपने काही ऐकलं नाही. तो नंतर खुर्चीवरून उठून गेला. पण, मलायकाच्या या कृतीचं खूप कौतुक होतं आहे.

एका नेटकऱ्याने लिहिलं, “मलायका खूप चांगली आहे. ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “अरहान आणि मलायका खूपचं भारी आहेत. त्यांनी दिलीपला दिलेली वागणूक खूप छान होती.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, मलायका खूप साधं जीवन जगत आहे. खूप प्रेम करते. शिवाय ती खूपच उदार व्यक्ती आहे. मला ती खूप आवडते.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मलायका खूप चांगली व्यक्ती आहे. तिनं दिलीपला कोणताही संकोच न करता डायनिंग चेअरवर बसवण्याचा प्रयत्न केला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दरम्यान, फराह खान आणि मलायका याचं नातं खूप जुनं आहे, कारण दोघींनीही अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं आहे. ‘मुन्नी बदनाम हुई’ ते ‘अनारकली डिस्को चली’पर्यंत मलायकाच्या या सुपरहिट गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन फराहने केलं आहे.