मलायका अरोरा खान सध्या तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ शोमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मलायकाने स्टँड अप कॉमेडी करताना बहीण अमृता अरोराची खिल्ली उडवली होती. मलायकाने अमृताच्या करिअर आणि कपड्यांवरून तिला ट्रोल केलं होतं. त्यावर अमृता चिडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोघी बहिणीत वाद झाला आहे. अमृताने मलायकाला भेटण्याचा प्लॅन करत कुटुंबासह सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मलायकाला राग आला.

एपिसोड दरम्यान, मलायकाने अमृताला तिच्या ख्रिसमसच्या प्लॅन्सबद्दल विचारण्यासाठी कॉल केला, परंतु अमृताने तिला सांगितलं की ती सुट्टीसाठी पॅकिंग करत आहे आणि तिला भेटणार नाही. हे ऐकताच मलायका रागावली, ती म्हणाली, “मी इथे बसले आहे, घर सजवते आहे, ख्रिसमस लंच करते आहे, या सगळ्याचा प्लॅन करत बसले आहे आणि तू नाहीस. पण मला सगळ्यात जास्त त्रास या गोष्टीचा होतोय की तू मला सांगितलंही नाहीस,” असं मलायका म्हणाली.

मलायकाने कपडे आणि करिअरबद्दल केलेल्या विनोदांवरून बहीण अमृता नाराज; म्हणाली, “तू माझ्याबद्दल…”

यावर अमृता अरोराने मी तुला सांगितलं होतं, असं उत्तर दिलं. “आम्ही संपूर्ण प्लॅन बदलण्याऐवजी, तू फक्त एक दिवस अॅडजस्ट करून घे. यात नाराज होण्यासारखं काही नाही,”असं अमृता म्हणाली. त्यानंतर, मलायका अरोरा सीमा सजदेहसोबत लंचवर गेली. त्यावर सीमाने सांगितलं की अमृता नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आपल्याबरोबर गोव्यात नसेल. हे ऐकून मलायकाला आणखी वाईट वाटलं आणि अमृताने आपल्याला सांगितलं का नाही, असं ती म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मलायका आता बहिणीवर रुसली असली तरी त्या दोघींनी ख्रिसमसचं सेलिब्रेशन एकत्र केलं होतं. त्याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.