अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती वरचेवर चित्रपटांमधून दिसत नसली तरीही ती नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. नुकताच तिचा वाढदिवस झाला. हा वाढदिवस तिने कसा साजरा केला हे सांगताना तिने आता तिचं खरं वय सांगितलं आहे.
कालच मलायकाचा वाढदिवस झाला. सोशल मीडियावरून तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी आणि मनोरंजन सृष्टीतील तिच्या मित्रमंडळींनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या. सगळ्यांनाच वाटलं होतं की हा तिचा ५०वा वाढदिवस आहे. पण तसं नाही. काल काही फोटो शेअर करत कॅप्शनमधून तिने तिचं खरं वय सांगितलं आहे.
मलायकाने काल तिचा वाढदिवस कुठलंही जंगी सेलिब्रेशन न करता एकांतात स्वतःला वेळ देत साजरा केला. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती तिच्या आवडीच्या ठिकाणी तिच्या आवडीचे पदार्थ खाताना दिसत आहे. तर हे फोटो शेअर करत खाली कॅप्शनमध्ये तिने तिचं वय ५० नाही तर ४८ असल्याचं तिने स्पष्ट केलं. काल तिने तिचा ४८ वा वाढदिवस साजरा केल्याचं तिने लिहिलं.
हेही वाचा : मलायका अरोरा – अरबाज खान पुन्हा येणार एकत्र? फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
त्यामुळे इतके दिवस सर्वजण मलायकाचं वय चुकीचं समजत होते. सर्वांचा तो समज आता स्वतः मलायकानेच दूर केला आहे.