Mamata Kulkarni अभिनेत्री ममता कुलकर्णीने महाकुंभमेळ्यात (Mahakumbh 2025) संन्यास घेतला. तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद देण्यात आले होते. पण ३१ जानेवारीला तिचीकिन्नर आखाडा व महामंडलेश्वर पदावरून तिची हकालपट्टी करण्यात आली. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीवर कारवाई केली. ममताला महामंडलेश्वर करण्यास आपला आधीपासून विरोध होता, असंही दास यांनी सांगितलं. त्यांनी ममता कुलकर्णीबरोबरच तिला महामंडलेश्वर करणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आखाड्यातून काढलं. दरम्यान ममता कुलकर्णीने याबाबत पोस्ट केली आहे. एवढंच नाही तर एक काळ असाही येऊन गेला की मला आयुष्य संपवावंसं वाटलं होतं मी प्रयत्नही केला पण अपयशी ठरले असंही ममता कुलकर्णीने म्हटलं आहे.

ममता कुलकर्णीची महामंडलेश्वर पदावरुन हकालपट्टी का करण्यात आली?

किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला आखाड्यातून काढलं. तसेच देशद्रोहाचा आरोप असलेल्या ममता कुलकर्णीला आखाड्यात घेतल्याबद्दल आणि त्यांच्या नकळत तिची महामंडलेश्वरपदी नियुक्ती केल्याबद्दल महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी केली आहे.

anil kapoor
अभिनेत्रीचा ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्याबरोबरच्या किसिंग सीनबाबत खुलासा; म्हणाली, “मला रडावे…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
shirish more suicide letters
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या चार चिठ्ठ्या
sant Tukaram maharaj suicide news in marathi
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
mumbai woman suicide news loksatta
मुंबई : सातव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
jaideep ahlawat on nepotizam and alia bhatt
‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावतचे नेपोटिझमवर भाष्य; आलिया भट्टबद्दल म्हणाला, “त्यात तिची चूक काय?”
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”

एक काळ असाही होता मला वाटलं होतं आयुष्य संपवावं-ममता कुलकर्णी

सिनेमासृष्टी, बॉलिवूड हे सगळं माया आहे याचा साक्षात्कार मला झाला त्यामुळे मी हातात ३० ते ४० चित्रपट असतानाही मी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. माझ्या आयुष्यात एक वेळ अशीही आली होती की मला वाटलं होतं मी स्वतःला संपवेन. ब्रह्मविद्या अभ्यास करणं ही बाब सोपी नाही. मला एकदा नाही तर खूप वेळा वाटलं की आपण आत्महत्या करावी, मी प्रयत्नही केला पण यशस्वी झाले नाही. एक काळ असा होता की साधू होणं, साध्वी होणं सोपं होतं. आता गोष्टी बदलल्या आहेत. असं ममता कुलकर्णीने म्हटलं आहे. मी असं म्हणत नाही की बॉलिवूडची लोकांन गरज नाही, ती लोकांना आहे. मला वाटतं लोकांना ते हवं आहे. पण माझा ओढा अध्यात्माकडे होता म्हणून मी इथे वळले असंही ममता कुलकर्णीने म्हटलं आहे.

मी महाकालीचा अंश आहे-ममता कुलकर्णी

मी महाकालीचा अंश आहे, आद्या आहे असं मला वाटतं. माझं मंदिर बांधलं होतं पण मला ते आवडलं नव्हतं. माझी मूर्ती कुणीही करु नये. पण मला अध्यात्म जास्त आवडलं मी याकडे वळले. असंही ममता कुलकर्णीने म्हटलं आहे. इंडिया टीव्हीवरील कार्यक्रम ‘आप की अदालत’च्या मुलाखतीत ममता कुलकर्णी आली होती त्यावेळी ममता कुलकर्णीने हे वक्तव्य केलं आहे.

घातक सिनेमात आयटम साँग का केलं?

घातक सिनेमात कोई जाये तो ले आये हे आयटम साँग मी केलं याचं उत्तरही ममता कुलकर्णीने दिलं. त्यावेळी माझा एक शो झाला होता. तो राजकुमार संतोषी यांनी पाहिला. तो शो त्यांना विसरता आला नाही. त्यावेळी राजकुमार संतोषी माझ्याकडे आले. मला म्हणाले घातक सिनेमाला बायर मिळत नाही. त्यामुळे माझ्याकडे ते गाणं घेऊन आले होते. त्यामुळे मी ते केलं होतं. सिनेमा विकला गेलाच पुढे काय झालं ते सगळ्यांना माहीत आहे. मी ते गाणं एखाद्या स्टेज शो प्रमाणेच केलं होतं. असं उत्तर ममता कुलकर्णीने दिलं.

Story img Loader