आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती अशा अनेक बाजू तो समर्थपणे सांभाळताना दिसतो. त्याने आतापर्यंत विविध मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटातही उत्तम भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच त्याने हिंदी चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

चिन्मय मांडलेकर लिखित–दिग्दर्शित ‘गालिब’ हे नवंकोरं मराठी नाटक नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अष्टविनायक प्रकाशित, मल्हार+वज्रेश्वरी निर्मित या नाटकात ‘माझा होशील ना’ मालिकेतील लोकप्रिय जोडी सई व आदित्य म्हणजेच गौतमी देशपांडे व विराजस कुलकर्णी पाहायला मिळणार आहेत. सध्या या नाटकाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यानिमित्ताने चिन्मय मांडलेकरने लोकसत्ता वृत्तपत्राशी संवाद साधला. यावेळी त्याने हिंदी सिनेसृष्टीत आणि मराठीत काम करतानाचा फरक सांगितला.
आणखी वाचा : क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’चा ट्रेलर प्रदर्शित, मराठी कलाकारांनी वेधलं लक्ष

“माझा हिंदी मनोरंजनसृष्टीत काम करण्याचा अनुभव चांगला आहे. मला तिथे विशेष असा काही फरक जाणवला नाही. पण त्यांचा स्तर अधिक मोठा आहे, हा फरक नक्कीच आहे. जिथे आपण एक मराठी चित्रपट साधारण २५ ते ३० दिवसात पूर्ण करतो. तिथे हिंदी चित्रपटसृष्टीत थोडीशी मुभा असते. कारण त्यांचा शूटींगचा काळ हा ५० ते ६० दिवसांचा असतो.

त्यामुळे निर्मिती खर्च आणि अन्य गोष्टींमुळे त्यात भव्यपणा नक्कीच जाणवतो. बाकी हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळा असा काही फरक जाणवला नाही. फक्त मराठी चित्रपटसृष्टीत बजेट आणि चित्रीकरणाच्या मर्यादित दिवसांच्या अनुषंगाने दिवसांचं काम थोडं जास्त असतं. तर हिंदी चित्रपटसृष्टीत थोडंसं निवांत काम चालू शकतं”, असे चिन्मय मांडलेकरने म्हटले.

आणखी वाचा : “मी सात महिने घरी बसलेलो, कारण सुबोध भावे…”, चिन्मय मांडलेकरनं सांगितला ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान चिन्मय मांडलेकरने ‘तेरे बिन लादेन’, ‘शांघाई’, ‘मोक्ष’, ‘समीर’, ‘भावेश जोशी सुपरहिरो’ या हिंदी चित्रपटात काम केले. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात चिन्मयने फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. काही दिवसांपूर्वी तो ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ या चित्रपटात झळकला.