प्रार्थना बेहरे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रार्थनाने २००९ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ‘पवित्र रिश्ता’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. नुकतंच प्रार्थनाने तिच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल भाष्य केले.

प्रार्थना बेहेरे ही सध्या सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच तिने तिच्या युट्यूब चॅनलवर अलिबागच्या घराची झलक दाखवली आहे. यावेळी तिला हॉलिवूड किंवा बॉलिवूडमधील आवडत्या अभिनेत्याबद्दल विचारले. त्यावर तिने कोणाचेही नाव घेतले नाही.
आणखी वाचा : “बाबांनी डोळे फिरवले, तोंडातून फेस येत होता अन्…” प्रार्थना बेहरेने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “त्यांची नस…”

“हॉलिवूड किंवा बॉलिवूडमधील असा कोणताही आवडता अभिनेता नाही. कारण मला असं नेहमी वाटते की सर्वच लोक कमाल आहेत. त्यामुळे मी जो कोणता चित्रपट पाहते, त्या अभिनेत्याच्या किंवा अभिनेत्रीच्या प्रेमात पडते, जर त्या अभिनेत्याने चांगलं काम केले असेल, तर मला तो आवडतो. मी स्वत: एक अभिनेत्री आहे, त्यामुळे मी समजू शकते. यामुळे आवडतं असं काही नाही, चांगला अभिनेता म्हणून मला तो आवडतो”, असे प्रार्थना बेहेरेने म्हटले.

आणखी वाचा : “त्यादिवशी ज्वारीचं पीठ संपलेलं आणि रिमाला… सुहास जोशी यांनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या “मी आजही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रार्थना बेहेरेने २००९ मध्ये मालिका विश्वात पदार्पण केले. झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील तिची भूमिका बरीच गाजली होती. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘मितवा’ या चित्रपटामुळे ती नावारुपाला आली. २०१७ साली अभिषेक जावकरशी लग्न केलं. लग्न झाल्यावर तिने काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून तिने पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.