अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा थाटामाटात पार पडला. सध्या जगभरात या सोहळ्याची चर्चा सुरू आहे. या भव्य सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाने विविध क्षेत्रांतील बड्या मंडळींना आमंत्रित केले होते. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, इवांका ट्रम्प, जगप्रसिद्ध गायिका रिहानापासून ते बॉलीवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पही या सोहळ्याला उपस्थित होती. या सोहळ्यात इवांकाने अनेक फोटोज काढले आणि सोशल मीडियावर शेअर केले. यातला एक फोटो वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. इवांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका मोठ्या हत्तीसमोर उभी राहिलेली दिसत आहे. या हत्तीच्या डोक्यावर सजावट केलेलीसुद्धा दिसत आहे.

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

हेही वाचा… रिहानाला पडली ओरीच्या कानातल्यांची भुरळ; फोटो शेअर करत म्हणाला…

इवांकाचा हा फोटो पाहून अभिनेता अर्शद वारसीची पत्नी मारिया गोरेट्टी हिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात मारिया म्हणाली, “अंबानींच्या सेलिब्रेशनमधील हा फोटो पाहून मी हैराण झाले. हे कोणत्याही प्राण्याबाबत घडले नाही पाहिजे, विशेषत: ज्या प्राण्यांची सुटका आणि पुनर्वसन केले जाते त्या प्राण्यांबाबत तर मुळीच नाही. मोठ मोठ्या आवाजात आणि लोकांच्या गराळ्यात या हत्तीला मधोमध उभं केलं आहे. हत्तीचा उपयोग फक्त कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी केला गेलाय.” मारिया गोरेट्टीची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, अर्शद आणि मारियाबद्दल सांगायचं झाल्यास, अर्शद वारसी आणि मारिया गोरेट्टीचं लग्न १४ फेब्रुवारी १९९९ रोजी झालं होतं. विशेष बाब म्हणजे अर्शद आणि मारिया यांनी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर लग्न केलं होतं. परंतु लग्नाची नोंदणी न केल्याने अवघ्या २५ वर्षानंतर अर्शद आणि मारियाने २३ जानेवारी २०२४ रोजी कायद्यासाठी लग्नाची नोंदणी केली.