चित्रपट निर्माता मधू मंटेनाने इरा त्रिवेदीशी ११ जून रोजी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाला व रिसेप्शनला बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती. मधू व इरा यांच्या लग्नाचे फोटोही खूप व्हायरल झाले होते. लग्नानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच मधू मंटेनाच्या एका कृतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘आदिपुरुष’वरील वादादरम्यान कंगना रणौतची पोस्ट चर्चेत, फोटो शेअर करत म्हणाली, “रामाचे नाव…”

इरा त्रिवेदीशी लग्न केल्यानंतर मधूने त्याच्या नावात बदल केला आहे. लग्नानंतर स्त्रिया आपल्या नावासमोर पतीचे आडनाव जोडतात. बॉलिवूडमध्येही अनेक अभिनेत्रींनी पतीचे आडनाव लावले, पण काहिंनी माहेरचं आडनाव कायम ठेवलं. पण कोणत्याही अभिनेत्याने आपल्या नावासमोर पत्नीचे आडनाव लावले नाही. अशातच हिंदी चित्रपट निर्माता मधु मंटेनाने पत्नीचं आडनाव लावलं आहे.

 वादात अडकूनही ‘आदिपुरुष’ची दमदार ओपनिंग; पहिल्याच दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

मधु मंटेनाने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर ‘मधु मंटेना त्रिवेदी’ असं लिहिलं आहे. एवढंच नाही तर इरानेही तिच्या नावासमोर पतीचे आडनाव लावले आहे. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर ‘इरा त्रिवेदी मंटेना’ असे लिहिलं आहे. मधु मंटेनाने पत्नीचं आडनाव लावल्यानंतर सोशल मीडियावर अनेक लोक त्याचे कौतुक करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ira madu mantena names
इरा त्रिवेदी-मधू मंटेना

इरा त्रिवेदी ही योगा शिकवते. तसेच ती लेखिकाही आहे. तिला फिरण्याची खूप आवड आहे. मधू आणि इरा एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. मधूने ‘गजनी’, ‘अग्ली’ आणि ‘क्वीन’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे.