नीना गुप्ता व मसाबा गुप्ता ही बॉलीवूडमधील मायलेकीची लोकप्रिय जोडी आहे. मसाबा पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच ती ट्विंकल खन्नाच्या ‘ट्वीक इंडिया’ शोमध्ये पाहुणी म्हणून दिसली होती. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. आई नीना गुप्ता तिच्या पहिल्या घटस्फोटासाठी स्वत:ला दोषी मानते, असंही मसाबाने सांगितलं.

नाना पाटेकरांनी अवघ्या ७५० रुपयांत केलेलं लग्न, बँकेत होत्या त्यांच्या पत्नी; असं काय झालं की वेगळे राहतात दोघं, जाणून घ्या

नीना यांचं वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सशी अफेअर होतं, त्यांनी लग्न न करताच मसाबाला जन्म दिला होता. त्यांनी एकल माता म्हणून मसाबाला मोठं केलं. मसाबा ही सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर व अभिनेत्री आहे, मसाबाने यावर्षाच्या सुरुवातीला दुसरं लग्न केलं. तिचं पहिलं लग्न मधू मंटेनाशी झालं होतं, पण त्यांचा अवघ्या चार वर्षातच घटस्फोट झाला होता, या घटस्फोटाला आपण जबाबदार असल्याचं नीना यांना वाटतं.

हेही वाचा – राहत्या घरात मृतावस्थेत आढळली प्रसिद्ध अभिनेत्री

पहिल्या लग्नाबद्दल बोलताना मसाबा म्हणाली, “मी लवकरात लवकर लग्न करावं, असं माझ्या आईला वाटत होतं. माझा घटस्फोट झाला तेव्हा तिला मोठा धक्का बसला. माझ्या आईला विश्वासच बसत नव्हता की आम्ही वेगळे होत आहोत. ती म्हणायची की अरे तुम्ही आताच लग्न केलंय आणि लगेच वेगळं होताय, फक्त २ वर्ष झाली आहेत. तुम्ही लोकांनी एकत्र जास्त वेळ घालवला नाही.”

Video: “हिंदू धर्मात काय वाईट होतं की तू इस्लाम स्वीकारला”? प्रश्न ऐकताच राखी सावंत गोंधळली; क्षणभर विचार केला अन्…

मसाबा पुढे म्हणली, “मला लग्नापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. पण माझ्या आईचा याला कडाडून विरोध होता. तिला आमच्या नात्याबद्दल कळाल्यावर तिने लगेचच माझं सामान पॅक केलं आणि मला घर सोडण्यास सांगितलं. दुसऱ्याच दिवशी तिने मला कोर्ट मॅरेज करायला लावलं. लग्नाशिवाय कोणीही कधीही सोडून जाऊ शकतं, असं तिला वाटायचं. तिने जी चूक केली तीच चूक मी करू नये असं तिला वाटत होतं, त्यामुळेच तिला लवकरात लवकर माझं लग्न करायचं होतं.”

“जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. हे सर्व माझ्या चुकीमुळे घडल्याचं ती म्हणाली. मी तुला लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची परवानगी द्यायला हवी होती. मी एक वाईट आई आहे,” असं नीना म्हणाल्याचं मसाबाने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, घटस्फोटाच्या चार वर्षांनी जानेवारी २०२३ मध्ये मसाबा गुप्ताने अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न केलं. दोघेही आनंदात संसार करत आहेत. तर मसाबाचा पहिला पती निर्माता मधू मंटेना यानेही इरा त्रिवेदीशी लग्नगाठ बांधली.