चित्रपट आणि ग्लॅमर इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंटपैकी एक, ‘मेट गाला २०२३’ सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमात हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंत अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट आणि प्रियांका चोप्रा यांनी ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, सध्या चर्चा कोणत्याही कलाकाराची नसून ‘मेट गाला’मधील जेवणाच्या मेन्यूची आहे. ‘मेट गाला’मधील जेवणातील मेनू ऑनलाइन लीक झाला आहे. हा मेन्यू बघून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

या वर्षी, ‘मेट गाला २०२३’ ची थीम दिवंगत डिझायनर कार्ल लेगरफेल्ड यांच्यावर आधारीत होती. ही थीम लक्षात घेऊन संपूर्ण कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. ‘मेट गाला २०२३’ मध्ये या थीमला ‘कार्ल लेगरफेल्ड : ए लाइन ऑफ ब्युटी’ असे नाव देण्यात आले होते. मात्र, या सगळ्यामध्ये आता मेट गालातील जेवणाच्या मेनूची जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचा- आई श्वेता तिवारीच्या गरोदरपणाबद्दल कळाल्यानंतर ‘अशी’ होती १५ वर्षीय पलकची प्रतिक्रिया

एका ट्विटर युजरने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ‘मेट गाला’मध्ये पोहोचलेल्या कलाकारांना नेमकं काय खायला दिले गेले हे सांगितले आहे. कार्ल लेगरफेल्ड यांना आवडत्या पदार्थावरुनच जेवणाचा मेन्यू बनवण्यात आला होता. मेट गालामध्ये कलाकारांना खायला दिलेले पदार्थ लोकांना बिलकूल आवडले नाहीत.

या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना चिल्ड स्प्रिंग पी सूप विथ बेबी व्हेजिटेबल, स्टार्टरमध्ये लेमन क्रेम फ्रायचे आणि ट्रफल स्नो असे विविध प्रकारचे सूप देण्यात आल्याचे वृत्त आहे. मेन कोर्समध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात कार्ल लेगरफेल्ड यांना आवडणाऱे पदार्थ ठेवण्यात आले होते. जेवणात ओरा किंग सॅल्मनचा समावेश होता, एक वेजिटेबल ब्रोथ, एसपैरेगस, स्ट्रॉबेरीचे लोणचे, मटणचा रस्सा सारखे पदार्थ ठेवण्यात आले होते. तसेच जेवणात विविध प्रकारच्या वाईन आणि डायट कोकचा समावेश होता. याशिवाय कार्ल लेगरफेल्ड यांचे आवडते पेयही शीतपेयांमध्ये ठेवले होते.

हेही वाचा- “इतर कलाकारांकडून अपेक्षा नाहीत, पण…”, महावीर फोगट यांनी कुस्तीपटूंसाठी आमिर खानकडे मागितली मदत; दिल्लीला घेराव घालण्याचाही इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता लोक ट्विटरवर या मेनूची खिल्ली उडवत आहेत. एकाने लिहिले आहे की, ‘सेलिब्रेटी स्वतःला इतके उपाशी ठेवतात की ते मरतात. अन्नाबाबत हा कोणता गुन्हा आहे? एकाने लिहिले ‘मेट गाला’ या कार्यक्रमाचे जेवण घृणास्पद आहे.