scorecardresearch

अनंत अंबानीच्या साखरपुड्यात मिका सिंगने १० मिनिटांच्या सादरीकारणासाठी आकारले ‘इतके’ कोटी, आकडा ऐकून व्हाल थक्क

मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंटशी नुकताच साखरपुडा संपन्न झाला.

अनंत अंबानीच्या साखरपुड्यात मिका सिंगने १० मिनिटांच्या सादरीकारणासाठी आकारले ‘इतके’ कोटी, आकडा ऐकून व्हाल थक्क

अंबानी कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी पहिल्यांदाच तिच्या जुळ्या मुलांना घेऊन भारतात आली आहे. घरी आल्यावर तिचा जंगी स्वागत करण्यात आलं. आता त्या पाठोपाठ ईशाचा जुळा भाऊ म्हणजेच उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंटशी नुकताच साखरपुडा संपन्न झाला. राजेशाही थाटात हा समारंभ पार पडला. या कार्यक्रमाची जितकी चर्चा होती तितकीच चर्चा आता या कार्यक्रमातील मिका सिंगच्या गाण्याची होत आहे.

अनंत अंबानीच्या साखरपुड्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनी त्यांची कलाही सादर केली. या समारंभात मिका सिंग यानेही गाणं गायलं. पण हे गाणं गाण्यासाठी त्याने करोडो रुपये आकारल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा : “आमच्या होणाऱ्या बाळाचं नाव तू ठेव…” चाहत्याच्या मागणीवर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर, म्हणाला, “तुम्हा दोघांना…”

या कार्यक्रमातला मिका सिंगच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने हा कार्यक्रमात १० मिनिटांचं सादरीकरण केलं. पण या १० मिनिटाच्या सादरीकरणासाठी त्याने १.५ कोटी रुपये आकरले आहेत.

हेही वाचा : ‘सिंग इज किंग’, मिकाने खरेदी केले खासगी बेट आणि…

दरम्यान अनंत आणि राधिका अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अंबानी कुटुंबातील प्रत्येक सोहळ्यात राधिका आवर्जून उपस्थित राहते. त्यांच्या साखरपुडाचे फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. त्याचप्रमाणे आता मिका सिंगने या सोहळ्यात गाण्यासाठी घेतलेल्या मानधनाच्या आकड्यानेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 12:22 IST

संबंधित बातम्या