Mithun Chakraborty’s Name Has Been Entered In The Guinness Book : मिथुन चक्रवर्ती ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांत काम केलं आहे. पण ते पूर्वी इतके व्यग्र असायचे की, एकाच वेळी ते ४१ चित्रपटांत काम करीत होते. त्यांचे एका वर्षांत सर्वाधिक चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्यांच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली.

मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलानं नुकत्याच RVCJला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या वडिलांबद्दलची माहिती दिली आहे. तो म्हणाला, “एक काळ असा होता जेव्हा कलाकारांकडे वेळ नसायचा. आता कलाकारांकडे खूप वेळ आहे. आता कोणीही येऊन निर्मिती करू शकत नाही. पूर्वी कोणीही सहज येऊन कलाकारांना चित्रपटांसाठी विचारायचे. हल्ली सगळं एजन्सी, पीआर यामार्फत केल जातं; पण पूर्वी कलाकारांना त्यांना हवं ते करण्याची मुभा होती.”

एकावेळी ४० चित्रपटांत काम करत असल्याने मिथुन चक्रवर्ती व गोविंदाला आलेलं पत्र

मिथुन चक्रवर्तींचा मुलगा निमांशी वडिलांबद्दल म्हणाला, “१९९३ दरम्यान मला आठवतं की, माझे वडील, गोविंदा व राहुल रॉय यांना CINTAAकडून पत्र मिळालेलं, ज्यामध्ये ते एका वेळी ४० चित्रपटांत काम करू शकत नाही, असं त्यांना सांगण्यात आलं होतं आणि माझे वडील त्यावेळी ४१ चित्रपटांत काम करीत होते, ज्यातील ३५ चित्रपटांत ते नायक होते.” पुढे त्यानं सांगितलं की, गोविंदाही त्यावेळी खूप लोकप्रिय अभिनेता होता.

निमांशीनं वडिलांबद्दल पुढे सांगितलं, “मी १० वर्षांचा असेपर्यंत मला त्यांच्याबद्दल काहीही जाणून घेता आलं नाही. त्यावेळी ते शूटिंगमध्ये खूप व्यग्र असायचे. मला त्या चित्रपटांच्या संख्येबद्दल काहीच वाटतं नाही. कारण- मी त्यांना कधी ते घरी थांबल्याचं पाहिलंच नाही. मी १० वर्षांचा होतो तेव्हा ते सकाळी शूटिंगनिमित्त लवकर घरातून बाहेर पडायचे आणि जेव्हा ते परतायचे तेव्हा मी झोपलेलो असायचो. मी त्यांना कित्येक वर्षं काम करताना पाहिलेलं आहे आणि अजूनही ते करीत आहेत.”

दरम्यान, मिथुन चक्रवर्ती बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांना १९८२मध्ये आलेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आजही ते चित्रपटांत काम करती आहे. नुकताच त्यांचा ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.