विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ऑस्कर २०२३ च्या नमांकन यादीत शॉर्टलिस्ट झाला आहे. खुद्द विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. या चित्रपटातील कलाकारांची नावंदेखील या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अनुपम खेर यांनीदेखील याविषयी ट्वीट करत आनंद व्यक्त केला.

गेल्यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला. काहींनी हा चित्रपट डोक्यावर घेतला तर काहींनी यावर सडकून टीका केली. गोव्यातील चित्रपट महोत्सवात नदाव लॅपिड यांनी चित्रपटाला व्हल्गर आणि प्रॉपगंडा म्हणून हिणवल्यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. आता याला ऑस्करच्या यादीत स्थान मिळाल्याने पुन्हा यावर चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीही यावर नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : “स्टार्स चित्रपटातील माझे सीन्स छाटायचे कारण…” कॉमेडी किंग जॉनी लिवर यांचा खुलासा

‘टाइम्स नाऊ’शी संवाद साधताना मिथुनदा म्हणाले, “द काश्मीर फाइल्स शॉर्टलिस्ट झाल्याचं वृत्त ऐकून फार आनंद झाला आहे. चित्रपटावर टीका करणाऱ्यांसाठी हे चोख उत्तर आहे. ज्या ज्युरींनी या चित्रपटाला प्रोपगांडा आणि व्हल्गर म्हणून हिणवलं त्यांना आज उत्तर मिळालं असेल. मी यावर आणखी भाष्य करून वादग्रस्त वक्तव्य देणार नाही. इतरही जे चित्रपट शॉर्टलिस्ट झाले आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने तब्बल ३०० कोटीहून अधिक कमाई केली. प्रेक्षकांनी हा चित्रपट चांगलाच उचलून धरला. या चित्रपटाला काहींनी इस्लामॉफोबिक म्हणून नावं ठेवली तर सामान्य प्रेक्षकांनी या चित्रपटासाठी बॉक्स ऑफिसवर तुडूंब गर्दी केली. विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.