गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये काम करण्यास बंदी आहे. २०१६ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून पाकिस्तानी कलाकार बॉलीवूडपासून दूर आहेत. मात्र, आता तब्बल ९ वर्षांनी पाकिस्तानी अभिनेता व टीव्ही स्टार फवाद खान हिंदी चित्रपटात कमबॅक करत आहे. ‘अबीर गुलाल’ हा सिनेमा ९ मे रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. पण, फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी एक्स पोस्ट महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, पाकिस्तानी कलाकारांना खुशाल डोक्यावर घ्या पण, सामना आमच्याशी आहे, असा इशाराही अमेय खोपकरांनी दिला आहे.
त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार – अमेय खोपकर
अमेय खोपकर म्हणाले, “पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे.”
पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना…
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 2, 2025
यापूर्वी देखील फवाद खानच्या सिनेमाला मनसेने विरोध केला होता. २०१४ मध्ये ‘खूबसूरत’ या पहिल्या हिंदी चित्रपटात फवादने काम केलं होतं. यानंतर तो आलिया भट्टच्या ‘कपूर अँड सन्स’ आणि अनुष्का-रणबीरसह ‘ए दिल हैं मुश्किल’मध्ये झळकला होता. आता जवळपास ८ ते ९ वर्षांनी फवाद कमबॅक करत आहे. याआधी त्याच्या ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या सिनेमावरून देखील वाद झाला होता.

