सध्याचा बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय गायक म्हणजे अरिजीत सिंग होय. पण अरिजीतला ही लोकप्रियता मिळवण्यापूर्वी बराच संघर्ष करावा लागला. एकेकाळी तो तासन् तास आपल्या ऑफिसमध्ये बसून असायचा असा खुलासा संगीत दिग्दर्शक माँटी शर्मा यांनी केला आहे.

लल्लनटॉपशी बोलताना माँटी शर्मा म्हणाले, “बदलत्या काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आधी आम्हाला एक गाणं पूर्ण करायला दोन लाख रुपयांचा खर्च यायचा. यात ऑर्केस्ट्राचाही समावेश होता. ज्यात ४० व्हायोलिनही इतर गोष्टी असायच्या. माझी काही गाणी सुपरहिट राहिल्यानंतर मी स्वतःचा ब्रँड तयार केला, तेव्हा मी एका गाण्यासाठी ३५ हजार रुपये मानधन घ्यायचो.”

अरिजीत सिंग २ कोटी रुपये घेतो

ब्रँड तुमची किंमत ठरवतो, असं माँटी शर्मा यांनी नमूद केलं. “एक वेळ अशी होती की अरिजीत सिंग माझ्या ऑफिसला यायचा आणि तासन् तास ब्रेक न घेता, जेवण न करता बसून असायचा. आता तो प्रत्येक परफॉर्मन्ससाठी दोन कोटी रुपये घेतो. आता जर कुणाला अरिजीत सिंगचा इव्हेंट ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये मोजावे लागतात,” असं माँटी शर्मा म्हणाले.

पूर्वी फक्त रेडिओ व टीव्ही हेच संवादाचे माध्यम होते, पण बदलत्या काळाबरोबर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आले आणि त्यातून महसूलही वाढला. “पूर्वी ऑडिओचे हक्क कोट्यवधी रुपयांमध्ये विकले जात होते, पण लोक ती गाणी फक्त रेडिओ आणि टेलिव्हिजनवरच ऐकत होते,” असं माँटी शर्मा यांनी सांगितलं.

ऑडिओ कंपन्या खूप पैसा कमावतात – माँटी शर्मा

“आता इतक्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, जास्त एक्सपोजर मिळतं. तसेच पैसाही खूप मिळतो. आताच्या गाण्यांमधून मिळणारा पैसा कल्पनेपलीकडचा आहे. एक संगीतकार एका गाण्याचे फक्त २० लाख रुपये आकारू शकतो, पण त्या बदल्यात तो ९०% गाण्याचे हक्क ऑडिओ कंपनीला देतो आहे,” असा दावा शर्मा यांनी केला. तसेच या संधीचा पुरेपूर फायदा घेणारे लोक व ऑडिओ कंपन्या आहेत, असं त्यांनी नमूद केलं. “ते खूप पैसे कमवत आहेत. कारण स्पॉटिफाय, यूट्यूब या बऱ्याच गोष्टी आहेत. यातून ते किती पैसा कमवतात तुम्हीच विचार करा,” असं शर्मा म्हणाले.

संगीत विश्वात काळानुरूप बदल झाले असले तरी संगीतकारांची कमाई मर्यादितच असते असं विधान शर्मा यांनी केलं. “गाण्याचा चेहरा गायक असतात. तेच गाण्याचा आवाज असतात, त्यामुळे त्यांना सर्वाधिक पैसे मिळतात. आता आलेले अनेक नवीन गायक कामासाठी १ ते २ कोटी रुपये मानधन घेतात,” असं शर्मा यांनी नमूद केलं.

आता कलाकार फक्त रॉयल्टीतूनच पैसे कमवत नाहीत, तर रिअॅलिटी शोसारखे इतरही स्त्रोत आहेत, ज्यातून त्यांना पैसा मिळतो. “एकेकाळी जेव्हा मी ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ हा रिॲलिटी शो करत होतो, तेव्हा मी रोजचे साडेसात लाख रुपये मानधन घेत होतो. आता त्यावर कोणतीही मर्यादा नाही. खूप पैसा आहे. रिॲलिटी शो मेंटर्सच्या माध्यमातून प्रचंड पै