Son Of Sardaar 2 Fame Actress says Mrunal Thakur Is the Next Superstar : ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. लवकरच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता अजय देवगण व मृणाल ठाकूर यामध्ये मुख्य भूमिकांतून झळकणार आहेत. मृणाल पहिल्यांदाच अजय देवगणबरोबर या चित्रपटामधून काम करीत आहे. अशातच या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री रोशनी वालियानं नुकतंच मृणालचं भरभरून कौतुक केलं आहे.

रोशनी वालिया लवकरच ‘सन ऑफर सरदार २’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच तिनं ‘फिल्मी ग्यान’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिनं अभिनत्री मृणाल ठाकूरबद्दल सांगितलं आहे. त्यासह रोशनीनं ‘सन ऑफ सरदार २’मध्ये काम करण्याचा तिचा अनुभवसुद्धा सांगितला आहे. रोशनी म्हणाली, ” ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटासाठी ऑडिशन दिल्यानंतर माझी निवड झाली; पण मी या चित्रपटात इतक्या दिग्गज कलाकारांसह काम करणार आहे यावर माझाच विश्वास बसत नव्हता”.

रोशनीनं पुढे याबाबत सांगितलं, “चित्रपटाच्या सेटवर अजयसरांनी माझी त्यांच्या मुलीप्रमाणे काळजी घेतली. अजयसर खूप गमतीशीर स्वभावाचे आहेत. मला सर्व कलाकारांबरोबर काम करताना खूप मजा आली. चित्रपटातील सर्व कलाकार खूप छान आहेत”. पुढे रोशनी मृणाल ठाकूरबद्दल म्हणाली, “मृणाल मला मोठ्या बहिणीसारखी आहे. ती मला खूप जवळची वाटते. तिनं मला मोठ्या बहिणीप्रमाणे खूप चांगले सल्ले दिले. तिनं मला तिच्या संघर्षाबद्दलही सांगितलं”.

रोशनी पुढे मृणालबद्दल म्हणाली, “ती एक सुपरस्टार आहे. माझ्या मते, तर ती बॉलीवूडमधील आणि भारतातील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. इंडस्ट्री कोणतीही असो; ती प्रत्येक ठिकाणी उत्तम काम करीत आहे आणि याचा मला खूप आनंद आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट येत्या २५ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, मृणाल ठाकूर, चंकी पाडे, संजय दत्त, संजय मिश्रा, रवी किशन, रोशनी वालिया यांसारखे प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाचा हा सीक्वेल आहे.