अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय आहे. ती अनेकदा शूटिंगच्या सेटवर किंवा मेकअप रूममध्ये असताना स्वतःचे अनेक गमतीदार व्हिडीओ शेअर करीत असते. त्यात ती कधी गाणी म्हणते, तर आपल्या सहकाऱ्यांबरोबरचे गमतीदार व्हिडीओज शेअर करते. मृणाल बऱ्याचदा मराठीतही व्हिडीओज शेअर करते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांना मराठीत उत्तरे देते.

मृणालने इन्स्टाग्रामवर नुकतेच ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेतले होते. त्यात तिच्या एका चाहत्याने तिला “मराठीतील तीन सर्वांत छान शब्द कोणते?” हा प्रश्न विचारला.

हेही वाचा…घराचं नाव ‘रामायण’, पण लेकीला त्याविषयी पुरेशी माहितीच नाही; मुकेश खन्नांनी शत्रुघ्न सिन्हांवर केली टीका, म्हणाले, “त्यांनी तिला…”

चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचे मृणाल ठाकूरने एक व्हिडीओ तयार करत उत्तर दिले आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला मृणाल ठाकूर म्हणते, ” मला ‘अभिनेत्री’ हा मराठीतील छान शब्द वाटतो. मला हा शब्द फार आवडतो. त्यानंतर ‘कलाकार’ हा शब्द मला खूप आवडतो.” मृणालला मराठीतील तिसरा चांगला शब्द कोणता वाटतो हे सांगताना ती खूप विचार करते. आणि शेवटी म्हणते, “तिसरा शब्द ‘जेवण’, ‘कोशिंबीर’ आणि ‘वातावरण’ हे शब्दही मला खूप आवडतात. मला वाटतं ‘वातावरण’ हा सगळ्यांचा आवडता शब्द आहे.”

पाहा व्हिडीओ –

Mrunal Thakur Favourite Marathi Words

मृणालने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याआधीही मराठी बोलताना, मराठी गाणी म्हणताना व्हिडीओज शेअर केल्या आहेत. मृणालला इन्स्टाग्रामवर तिच्या एका चाहत्याने ती मराठी आहे का? हा प्रश्न विचारला होता. हे सांगताना मृणालने तिच्या सहकाऱ्यांसह ती मराठी आहे हे दाखवण्यासाठी एक गाणे म्हणून दाखवले. मृणालने तिच्या सहकाऱ्यांसह ‘सांग सांग भोलानाथ’ हे गाणे म्हणून दाखवले होते.

हेही वाचा…“…म्हणून मला बॉलीवूड पार्ट्यांमध्ये बोलवत नाहीत”, अभिनेते मनोज बाजपेयींचा खुलासा; म्हणाले, “त्यांना वाटतं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृणाल ठाकूरने ‘मुझसे कुछ केहती है…ये खामोशीया’ या हिंदी मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला ‘कुम कुम भाग्य’ या मालिकेतून खरी ओळख मिळाली. पुढे तिने ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिचा ‘सीता रामम’ हा सिनेमा लोकप्रिय झाला. आता मृणाल ठाकूर लवकरच ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटात दिसणार आहे.