दिग्गज अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांनी ६०-७० च्या दशकात सिनेसृष्टीवर राज्य केलं. त्या त्यांच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. लोक त्यांच्या सौंदर्याचे व अभिनयाचे कौतुक करायचे. त्यांची व राजेश खन्ना यांची पडद्यावरची जोडी लोकांना खूप आवडायची. दोघांनी १० चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि ते सर्व हिट ठरले. याचबरोबर मुमताज व शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांच्या केमिस्ट्रीची त्याकाळी खूप चर्चा व्हायची.

मुमताज व शम्मी यांचं ‘आज कल तेरे मेरे प्यार चर्चे’ हे गाणं आजही ऐकायला मिळतं. या दोघांनी ‘ब्रह्मचारी’, ‘राम तेरे कितने नाम’, ‘ठोकर’ व ‘वल्लाह क्या बात है’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. या दोघांच्या ऑनस्क्रीन केमेस्ट्रीप्रमाणेच त्यांच्या नात्याचीही खूप चर्चा झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, पण शम्मी कपूर यांच्या एका अटीमुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. ती अट काय होती, याबाबत खुद्ध मुमताज यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Video: “धीरे धीरे…”, ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरच्या रोमँटिक गाण्याचा धुमाकूळ, नेटकरी म्हणाले, “ज्युनियर श्रीदेवी…’

मुमताज यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यात त्यांनी राजेश खन्ना यांच्या करिअरला लागलेली उतरती कळा, शम्मी कपूर यांच्याबरोबरचं अफेअर व लग्न याबाबत सांगितलं. मुमताज यांनी शम्मी कपूर यांच्यावर प्रेम असूनही लग्न का केलं नाही, त्याबाबत माहिती दिली. शम्मी कपूर व मुमताज यांची पहिली भेट ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती आणि याच काळात दोघेही प्रेमात पडले. शम्मी यांनी तेव्हाच मुमताज यांना लग्नासाठी प्रपोज केलं.

लग्नाला झाली १० वर्षे, आई होऊ शकत नाहीये प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “माझ्या अन् पतीच्या वयातील अंतरामुळे…”

(Mumtaz Shammi Kapoor Affair) मुमताज म्हणाल्या, “त्यावेळी मी फक्त १७ वर्षांची होते. मी नुकतीच माझ्या करिअरची सुरुवात केली होती, पण तरीही मी त्यांच्याशी लग्न करायला तयार होते. पण शम्मी यांच्या एका अटीने मला लग्न करण्यापासून रोखलं आणि मी लग्नाला नकार दिला.”

why mumtaz broke up with shammi kapoor
शम्मी कपूर व मुमताज (फोटो – संग्रहित)

शम्मी कपूर यांनी ठेवली होती अट

मुमताज यांच्यामते, शम्मी कपूर यांच्याइतकं प्रेम त्यांच्यावर कोणीच करू शकणार नाही. पण तरीही अभिनेत्रीने नातं संपवलं. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. मुमताज यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करू नये असं शम्मी कपूर यांना वाटत होतं. मुमताज यांनी लग्नानंतर अभिनय सोडावा असं त्यांचं मत होतं. कारण त्याकाळी कपूर घराण्यातील सुनांना चित्रपटांमध्ये काम करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे शम्मी यांनी ही अट ठेवली होती. शम्मी यांना कुटुंबाची परंपरा जपायची होती, तर मुमताज करिअर सोडायला तयार नव्हत्या.

श्वेता बच्चनला खूप आवडायचा वहिनी ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड; त्याची ‘ही’ वस्तू जवळ घेऊन झोपायची, स्वतःच केलेला खुलासा

मुमताज म्हणाल्या की आताही त्यांना शम्मी कपूर यांची आठवण आली की रडायला येतं. “मी त्यांना कधीच विसरू शकले नाही. ते फक्त अफेअर नव्हतं, तर आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं,” असं मुमताज यांनी सांगितलं.

“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नात्याबद्दल काय म्हणाले होते शम्मी कपूर?

शम्मी कपूर एकदा मुमताज यांच्यासोबतच्या नात्याबद्दल बोलले होते. मुमताजबरोबरचं नात म्हणजे एक वाईट स्वप्न होतं. “त्यावेळी माझ्या पत्नीचं निधन झालं होतं आणि मुमताज खूप सुंदर व तरुण मुलगी होती,” असं ते म्हणाले होते. दोघांनी सोबत राहायची स्वप्ने पाहिली, पण काही काळातच दोघांसाठीही हे नातं एक वाईट स्वप्न ठरलं. शम्मी कपूर आता हयात नाहीत. २०११ साली त्यांचे निधन झाले.