प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मागच्या साडे चार दशकांपासून ते प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करत आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा भूमिका वठवल्या आहेत. ग्लॅमर क्षेत्रात काम करत असूनही नाना पाटेकर खूप साधे राहतात.

“मला पद्मश्री पुरस्कार का दिला?” नाना पाटेकरांचा प्रश्न; म्हणाले, “माझ्यासारख्या माणसाला…”

नानांना जेवण बनवायची खूप आवड आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक कलाकारांना घरी जेवायला बोलावलं आहे. काही काळापूर्वी प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी नानांचा जेवण बनवतानाचा एक व्हिडीओही शेअर केला होता. आता नाना ‘द व्हॅक्सिन वॉर’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांचा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी नवभारत टाइम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या जेवण बनवण्याच्या आवडीबद्दल सांगितलं आहे.

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

नाना म्हणाले, “मी जेवण खूप चांगलं बनवतो. मला उत्तम स्वयंपाक येतो आणि मला जेवण बनवायला खूप आवडतं. शुटिंग करतानाही एक दिवस तरी मी सर्वांसाठी स्वतः जेवण बनवतो तेही कमीत कमी ५०-६० लोकांसाठी. जेवण बनवून खाऊ घालण्यात मला आनंद मिळतो. मला आई बनण्यात खूप आनंद मिळतो. आईची भूमिका तर मी करू शकत नाही, त्यामुळे मी ‘कन्फेशन’ चित्रपटात वडिलांची भूमिका केलीय. त्यात मी एक डायलॉगही टाकला होता. मला नेहमीच आई व्हायचं होतं, पण मी होऊ शकलो नाही म्हणून मी बाबा झालो.”

प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या मुलाखतीत नाना पाटेकरांनी आपण अभिनय करताना भावुक सीन चित्रित करण्यासाठी कधीच ग्लिसरीन वापरत नसल्याचंही म्हटलं. तसेच त्यांनी बाबा आमटे यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.