मुघल भारतात लूट करण्यासाठी आले आणि त्यांनी मंदिरं उद्ध्वस्त केली, ही चुकीची माहिती आहे. सर्व मुस्लिमांना एका रंगात रंगवण्याचा सध्याच्या सरकारचा प्रयत्न आहे, असं ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत. मुघलांना लक्ष्य करणे सोपे झाले आहे कारण ते एकमेव आहेत, ज्यांच्याबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे, असंही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह म्हणाले, “मोगल हा इंग्रजी शब्द, अमेरिकन शब्द बनला आहे. सर्व मुस्लिमांना एका रंगात रंगवण्याचा आणि मुघलांचा दर्जा खाली आणणे हे सध्याच्या सरकारसाठी खूप सोयीचे आहे. त्यांनी देश लुटला, त्यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली, त्यांनी हे आणि ते केलं, त्यांना अनेक बायका होत्या, असे अनेक दावे केले जातात.”

हेही वाचा – “एखाद्या मुस्लीम नेत्याने…”, नसीरुद्दीन शाहांची पंतप्रधान मोदींवर टीका; निवडणूक आयोगालाही सुनावले खडे बोल

शाह यांनी राजा अलेक्झांडरचे उदाहरण दिले आणि म्हटलं की “त्याने संपूर्ण इराणचा नाश केला, परंतु तरीही तो महान होता, असं म्हटलं जातं. मुघलांचा इतिहास समजून घेणं महत्त्वाचं आहे. मुघल भारताला आपली मातृभूमी बनवण्यासाठी आले होते, ते इथे लुटायला आले नव्हते. नादिरशहाने मोराचे सिंहासन चोरले. त्याने दिल्ली उद्ध्वस्त केली आणि दिल्लीतील नागरिकांची कत्तल केली, त्यांना लुटलं हे लोकांना माहीत नाही.”

“मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…”

बाबर आणि हुमायूनच्या रानटीपणाच्या कथांवरही त्यांनी भाष्य केलं. “हुमायून हा अफूचा व्यसनी होता, तो एके दिवशी पायरीवरून खाली पडला. अकबराने अमूक केलं, असं म्हटलं जातं. खरं तर औरंगजेब या सर्वांमध्ये सर्वात मोठा खलनायक होता. पण मुघलांबद्दल बोलणारे पूर्वी इथं असलेल्या इतर घराण्यांबद्दल बोलत नाहीत. मुघल राजघराण्याआधीही इथं तुर्कांची अनेक घराणी होती,” असं ते म्हणाले.

शालेय अभ्यासक्रम बदलणार आहेत, त्यावरूनही शाह यांनी टीका केली. “उत्क्रांतीचा सिद्धांत पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकला आहे. मला तर वाटतं की आइन्स्टाइनची विज्ञानाची पाठ्यपुस्तकंही काढून टाकली जातील. मग सर्व वैज्ञानिक शोध वेदांमध्ये आहेत, पाश्चिमात्य देश या सर्व शोधांचं श्रेय घेत आहेत, असं इस्रोचे प्रमुख म्हणताना दिसतील,” असा टोला नसीरुद्दीन शाहांनी लगावला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naseeruddin shah says modi government trying to paint all muslims in one colour hrc
First published on: 31-05-2023 at 14:24 IST